शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाणे व पारोळ््याचे पोलीस निरीक्षक मुख्यालयी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:14 PM

पोलीस दलात खळबळ

ठळक मुद्दे७५ कर्मचाऱ्यांनाही पोलीस अधीक्षकांचा दणका विशेष प्रशिक्षणाच्या नावाखाली जळगावी महिनाभर येण्याच्या सूचना

जळगाव : पोलीस दलातील अंतर्गत शह काटशहाचे राजकारण व अवैध धंद्यांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी ‘वॉश आऊट’ मोहीम राबवत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरूद्ध आढाव यांची आर्थिक गुन्हा शाखेत तर पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांची मानव संंसाधन विभागात तडकाफडकी बदली केली आहे. यासह जिल्ह्यातील ३५ पोलीस स्टेशनमधील ७५ ‘विशेष दबदबा’ असलेल्या पोलीस कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षणाच्या नावाखाली जळगावी महिनाभर येण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कारवाईने जिल्ह्याच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत शह काटशहाचे राजकारण टोकाला गेले असून येथे लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. यातूनच दोन पोलीस कर्मचारी गेल्या काही दिवसात लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत. याबाबतचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतल्याचीही पोलीस दलात चर्चा आहे.विलास सोनवणे यांच्यावरही ठपकापारोळा पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटनांच्या विषयावरून तेथील पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांना यापूर्वी एकदा इशारा देणारी नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्यावरही अवैध धंदे नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची पोलीस मुख्यालयातील मानव संसाधन विभागात पदस्थापना करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यांच्या जागी पाचोरा भागाचे वाचक शाखेतील अधिकारी सचिन सानप यांची बदली करण्यात आली असून त्यांना आदेश मिळाल्यानंतर तत्काळ पारोळा येथे हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्यावरही पोलीस अधीक्षकांनी आॅक्टोबर महिन्यात त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध धंदे नियंत्रणात न आणल्याचा ठपका ठेवत उलबांगडी करून जळगावी मुख्यालयात बदली केली होती. त्यानंतर आता पुन्हा दोन पोलीस निरीक्षांना झटका देत त्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.अवैध धंदे नियंत्रणात आणण्यात आढाव अपयशीअनिरूद्ध आढाव यांची बदली करताना त्यांच्यावर काही ठपके ठेवण्यात आले आहेत. यात म्हटले आहे की, आढाव हे त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहेत. या संदर्भात गुन्हे शाखेच्या वेळोवेळी घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांच्या सूचना, निर्देशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अवैध धंद्यांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचेच लक्षात येत आहे. आढाव यांच्या कार्यक्षेत्रात अपर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकून अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे या कारवायांमध्ये त्यांची भूमिका ही उदासिन असल्याचेच लक्षात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन त्यांची आर्थिक गुन्हे शाखा जळगाव येथे बदली करण्यात येत आहे. त्याच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांची बदली करण्यात आली आहे.प्रभावशाली ७५ कर्मचारी प्रशिक्षणाच्या नावाखाली जळगावातजिल्ह्यात ३५ पोलीस स्टेशन आहेत. या पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या विशेष गुन्हे शाखेत काही जणांची नियुक्ती असते. त्यांचा संपर्क थेट पोलीस निरीक्षकांशी असतो तसेच या कर्मचाºयांचा ‘विशेष दबदबा’ असतो. असे प्रत्येक पोलीस स्टेशनमधून काही जणांना प्रशिक्षणाच्या नावाखाली जळगावी हलविण्यात आले आहे.या कर्मचाºयांना तब्बल महिनाभर जळगावी ‘विशेष नवचैतन्य कोर्स’ साठी बोलाविण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर असा या प्रशिक्षणाचा कालावधी असेल. जळगावी आलेल्या या कर्मचाºयांची रोज बायोमेट्रीक पद्धतीने सकाळ, दुपार व रात्री हजेरी घेतली जावी असे फर्मानही पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव