२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पोलीस दलाची आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:11 IST2019-11-26T22:11:42+5:302019-11-26T22:11:58+5:30
जळगाव : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दशशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांसह परदेशी व भारतीय नागरिकांना मंगळवारी जिल्हा पोलीस ...

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पोलीस दलाची आदरांजली
जळगाव : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दशशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांसह परदेशी व भारतीय नागरिकांना मंगळवारी जिल्हा पोलीस दलातर्फे आदरांजली वाहण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात सकाळी ११ वाजता श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यासह अधिकाऱ्यांनी शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.मुंबईच्या इतिहासातील महाभंयकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दशहतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकास जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते.
श्रध्दांजली कार्यक्रमाला जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक डी.एम.पाटील,राखीव पोलीस निरीक्षक सुभाष कावरे, कार्यालय अधिक्षक विलास पवार, सहायक निरीक्षक राजेश शिंदे, वाचक सिध्देश्वर आखेगावकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
संविधान दिवसाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्यासह उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.