अन् पाड्यावरील आदिवासी बांधव आले धावून, विमान अपघातातील जखमी तरुणीला झोळीतून रुग्णालयात पोहोचवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 20:38 IST2021-07-17T20:30:00+5:302021-07-17T20:38:10+5:30
जखमी अंशिका हिला झोळी करुन वर्डीपर्यत आणण्यात आले. तिथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

अन् पाड्यावरील आदिवासी बांधव आले धावून, विमान अपघातातील जखमी तरुणीला झोळीतून रुग्णालयात पोहोचवलं
संजय सोनवणे/ संजय पाटील
चोपडा जि. जळगाव : वर्डी परिसरातील मिनी विमान कोसळल्याने अचानक मोठा आवाज झाला आणि या आवाजाने डोंगररांगाही हादरल्या. काही अंतरावर असलेल्या झोपडीमधील लोक तिकडे धावले. त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत जखमी अंशिका हिला बाहरे काढले. जखमी अंशिका हिला झोळी करुन वर्डीपर्यत आणण्यात आले. तिथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
शिरपूर येथील वैमानिकाचे प्रशिक्षण देणाऱ्या एव्हिएशन स्कूल चे छोटे विमान बिघाड झाल्याने वर्डी तालुका चोपडा परिसरात सातपुडा पर्वतातील दरी मध्ये झाडावर कोसळले. त्यात पायलट नुरुल अमीन (३२) ठार झाला तर प्रशिक्षणार्थी अंशिका लखन गुजर (२८) ही गंभीर जखमी झाली. शिरपूर जिल्हा धुळे येथील स्कूल ऑफ एव्हीएशन या वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या स्कूलचे छोटे विमान शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास
वर्डी येथून १० किलोमीटर अंतरावर सातपुडा पहाड भागात कोसळले. ज्या भागात विमान कोसळले तो भाग अतिशय दुर्गम, निर्जन असा आहे. इथून शेजारी काही अंतरावर पाडा होता आहे. या पाड्यावर रहिवासी आदिवासी तरुणांना मोठा आवाज झाला. आदिवासी तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मृत पायलट नुरुल अमिन व जखमी अंशिका गुजर यांना बाहेर काढले. विमान पडल्याचा आवाज आल्याने वर्डी येथून अनेक तरुण घटनास्थळी धावले आणि जखमी अंशिका हिला झोळीत टाकून आणले.
घटनेची माहिती मिळताच चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, डॉ नदीम शेख हे चालक तोसिफ खान पठाण यांना १०८ रुग्णवाहिकेसह वर्डीपासून अडीच किमी अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतापर्यंत पोहोचले. त्यानंतर अंशिका हिला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा
रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.