शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्राळानगरीत विठ्ठल नामाचा जयघोष!

By admin | Updated: July 4, 2017 16:34 IST

रथोत्सव : दर्शनासाठी अलोट गर्दी : माजी मंत्री सुरेशदादा जैन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.4- ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ च्या गजरात मंगळवारी शहरातील पिंप्राळा नगरी दुमदुमली.आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळा येथील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रथोत्सवाचे हे 142 वे वर्ष होते. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. महाआरती झाल्यानंतर वरुणराजाने रथावर जणू जलाभिषेक केला. 
मंगळवारी दुपारी 12.30 वाजता माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी, पिंप्राळ्यातील गांधी चौकात मोगरीवाले व रथोत्सवासाठी सहकार्य करणा:या बांधवांचा सत्कार झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, जि.प.महिला व बालकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, मनपा स्थायी समिती सभापती वर्षा खडके, जळगाव पीपल्स बॅँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, माजी उपमहापौर सुनील महाजन, माजी महापौर विष्णु भंगाळे, करीम सालार, नगरसेवक अमर जैन, शोभा बारी, लता मोरे, नरेश खंडेलवाल,  वाणी पंच मंडळाचे मोहन वाणी, योगेश वाणी, प्रकाश वाणी, नंदकिशोर वाणी, पंकज वाणी आदी उपस्थित होते. 
तत्वत: नव्हे सरसकट पाऊस पडावा-गुलाबराव पाटील
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गेल्या वर्षाप्रमाणे  यंदा ही दमदार पाऊस पडावा, तत्वत: न पडता तो सरसकट पडावा असा टोलाही त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून आमदार सुरेश भोळे यांच्याकडे  पाहत हाणला. त्यांच्या वक्तव्याने हशा पिकला.   
पांडुरंगाला शेतक:यांची चिंता-सुरेशदादा जैन
सुरेशदादा जैन  म्हणाले की, पिंप्राळा रथोत्सवाची पंरपरा  शंभरहून अधिक वर्षाची आहे. रथ निघाल्यावर नेहमी पावसाचे आगमन होत असते. पांडुरंगाला शेतक:यांची चिंता असते. यंदाही चांगला पाऊस  होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पिंप्राळ्यातील वाणी पंच मंडळ व विठ्ठल मंदिर संस्थानच्या पदाधिका:यांचा सत्कार करण्यात आला. 
पावसातही भाविकांचा उत्साह
रथाची आरती झाल्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच रथ ओढणा:या युवकांचा देखील उत्साह वाढला होता. ‘माऊली.माऊली’ च्या गजरातच रथाचे मार्गक्रमण झाले.