पिंप्राळा हुडको येथे हातमजुराने घेतला झाडाला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:55 IST2020-12-15T19:55:20+5:302020-12-15T19:55:35+5:30
जळगाव : पिंप्राळा हुडको येथील ज्ञानेश्वर भानु चव्हाण (वय ३५) या हातमजुराने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ...

पिंप्राळा हुडको येथे हातमजुराने घेतला झाडाला गळफास
जळगाव : पिंप्राळा हुडको येथील ज्ञानेश्वर भानु चव्हाण (वय ३५) या हातमजुराने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.ज्ञानेश्वर चव्हाण हा तरुण हातमजूरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. सोमवारी दुपारी दोन वाजता जेवण करुन तो घरातून बाहेर निघाला.सायंकाळी उशीरा घरी न आल्यानंतर पत्नी व मुलीने त्यांचा शोध घेतला. घरापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानाच्या झाडाला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला होता. गळफास घेण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तपास महेंद्र पाटील करीत आहे.