नेरीजवळील अपघातात पिंप्राळा येथील प्रौढ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:33 IST2018-08-30T17:31:30+5:302018-08-30T17:33:09+5:30
मित्राची दुचाकी घेऊन कुटुंबाच्या भेटीसाठी घरी येत असलेल्या संजय राजाराम बारी (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव) यांना अज्ञात वाहनाने बुधवारी दुपारी नेरी गावाजवळ धडक दिली. जखमी झालेल्या बारी यांचा गुरुवारी सकाळी आठ वाजता जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

नेरीजवळील अपघातात पिंप्राळा येथील प्रौढ ठार
जळगाव : मित्राची दुचाकी घेऊन कुटुंबाच्या भेटीसाठी घरी येत असलेल्या संजय राजाराम बारी (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव) यांना अज्ञात वाहनाने बुधवारी दुपारी नेरी गावाजवळ धडक दिली. जखमी झालेल्या बारी यांचा गुरुवारी सकाळी आठ वाजता जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
संजय बारी हे बांधकामावर कामाला जातात. सोयगाव तालुक्यातील आमखेडा येथे बांधकाम सुरु असल्याने ते कामाच्याच ठिकाणी रहात होते. कामावरील मित्राने नवीन दुचाकी घेतल्याने ती दुचाकी घेऊन ते बुधवारी कुटुंबाच्या भेटीसाठी येत असताना नेरीजवळील भवानी मंदिराजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.