शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

खालच्या पातळीवर काम करणारा माणूस महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 17:44 IST

जयप्रकाश काबरा । रोटरीतर्फे दोन पुस्तकांचे प्रकाशन

जळगाव : जगातील सगळ्या कल्पना या खालच्या पातळीवरून आलेल्या आहेत. त्यामुळे खालच्या पातळीवर काम करणारा माणूस खूपच महत्वाचा आहे, हे लक्षात येईल. कागदाला टाचणी कशी लावायची, हे मी शिपायाकडून शिकलो, असे प्रतिपादन सुप्रसिध्द वक्ते जयप्रकाश काबरा (ठाणे) यांनी केले.रोटरी परिवारातील ज्येष्ठ सदस्य व उद्योजक डॉ. किशन काबरा यांच्या इमोशनल ग्रोथ यांच्या पुस्तकाच्या व्दितीय आवृत्तीचे तसेच अशोक जोशी अनुवादीत ‘स्वर्ग हवाय कुणाला?’ पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. कांताई सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. ते म्हणाले की, प्रकाश आमटे यांच्याशी माझा जवळचा संबंध आला. त्यांच्या येथे गेल्यावर कळले की, तेथील रोग्यांनी ज्यांना जगानं एका बाजूला सारलं होतं, त्यांनी ७०० ग्रॅमचा गुलाब फुलवला, त्यांनीच ७ किलोचे वांगे बनवले. म्हणजे कोणतीही कल्पना ज्यांना आपण खालच्या पातळीवरचे म्हणतो, पण त्यांनीच जगाला केवढ्या मोठ्या गोष्टी दिल्यात हे ऐकलं, पाहिलं तर आश्चर्य वाटेल, असे ते म्हणाले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक (धुळे) हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीष कुलकर्णी यांनी केले. लेखक डॉ. किशन काबरा यांनी आपल्या मनोगतात जीवनाला समजायचे असल्यास मागे वळून पहा व जीवन जगायचे असल्यास भविष्याचा वेध घ्या. अनुवादक अशोक जोशी यांनी मनोगतात डॉ. किशन काबरानं समजण्याची संधी पुस्तकातून मला मिळाली. व्यवस्थापिका सुजाता बोरकर यांनी परिचय करुन दिला तर सपना काबरा यांनी आभार व्यक्त केले. गिरीश कुळकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास माजी महापौर रमेशदादा जैन, संजय बिर्ला, माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नारायण लाठी, कॅप्टन मोहन कुळकर्णी, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. प्रीती अग्रवाल, डॉ. शिल्पा बेंडाळे, सुशील नवल, अ‍ॅड. प्रवीण जंगले, नितीन रेदासनी, अनिल कांकरिया आदी उपस्थितहोते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव