शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना -महाजन

By admin | Updated: December 22, 2014 14:46 IST

दुष्काळ निवारणावर दरवर्षीच मोठा खर्च होतो मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी राज्य शासन काम करीत असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

जामनेर : हरितक्रांती घडविण्याचे आपले नेहमीचे स्वप्न होते. आता जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाल्यामुळे प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतीला वीज आणि पाणी देण्याचे माझे प्रयत्न असतील. दुष्काळ निवारणावर दरवर्षीच मोठा खर्च होतो मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी राज्य शासन काम करीत असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

तेली समाजातर्फे आयोजित संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व सत्कार सोहळ्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना महाजन बोलत होते. व्यासपीठावर आर.टी. चौधरी, भुसावळचे माजी प्र.नगराध्यक्ष अनिल चौधरी, जि.प. सदस्य नामदेव तेली, उपनगराध्यक्ष उत्तम पवार, महेंद्र बाविस्कर आदी उपस्थित होते.
विजेवर उपायासाठी सोलरपंप
राज्यभरात विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. वीज, पाणी शेतकर्‍यांच्या मुख्य गरजा आहे. याच दृष्टिकोनातून विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना पाच लाख सोलर पंप देण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. एक सोलर पंप पाच लाख रुपयांचा आहे. यात शेतकर्‍याचे २५ हजार तर शासनाचा पावणेपाच लाख रुपये हिस्सा राहील. यामुळे वाटेल तेव्हा पिकांना पाणी देता येईल. त्याचबरोबर उद्योगांना, ग्राहकांनाही वीज देता येईल, असेही जलसंपदामंत्री महाजन यांनी नमूद केले. 
(वार्ताहर)
■ जलसंपदा हे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे खाते असून ते शेतकर्‍यांशी निगडित आहे. मोठय़ा प्रमाणावर निधी याच खात्यातून खर्च होत असल्याने अजित पवार यांनी पंधरा वर्ष ते आपल्याकडेच ठेवले होते. मात्र राज्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराने या खात्याचा बट्टय़ाबोळ केला आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीची परवानगी दिली गेली आहे. खात्यात खूप अनियमितता आहे. ते भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. शेतकरी हितासाठी कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही महाजन म्हणाले. 
--------------------------
गावागावात हवामानमापक यंत्रे
ऐनपूर, ता.रावेर : नेहमी येणार्‍या वादळ, पाऊस, गारपिटीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरीवर्गाला दिलासा देण्यासाठी गावागावात हवामानमापक यंत्र बसवले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
आतापर्यंत हवामानमापक यंत्र हे प्रत्येक तालुक्याच्या मंडळ असलेल्या ठिकाणी बसविण्यात आले होते.ते यापुढे प्रत्येक गावागावात बसविले जाणार आहे. मंडळाच्या ठिकाणी असलेल्या यंत्रामुळे शासनाला नुकसानीचा अंदाज नेमका ठरवता येत नव्हता. नुकसानीचा योग्य अंदाज बांधण्याकरिता महाराष्ट्रात प्रत्येक गावात हवामानमापक यंत्र बसवले जाणार असल्याने त्या गावात वादळ, गारपीटमुळे किती नुकसान झाले याचा अंदाज कळणार आहे.
यंत्रामुळे मिळणार विम्याची रक्कम 
गावात यंत्र बसल्यानंतर शेतकर्‍यांनी काढलेल्या विम्याची रक्कम तत्काळ मिळण्यासाठी याचा फायदा होणार आहे. 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन-धन योजनेंतर्गत लाभाथर्र्ींचे खाते न उघडणार्‍या राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी बडतर्फ केले जातील.तसेच जे अधिकारी खाते उघडणार नाही त्यांचीही आपल्याकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन खडसे यांनी केले.
नुकसान भरपाई हेक्टरी दहा हजारावरून २५हजार रुपये करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली
ऐनपूर येथे दिवंगत डिगंबर पाटील यांच्याकडे आले असता शेतकर्‍यांच्या समस्या समजण्याकरिता त्यांनी शेतकर्‍यांची सभा घेतली.पं.स. सदस्य नंदू महाजन, अशोक कांडेलकर, राजेंद्र पाटील, प्रगतशील शेतकरी विकास महाजन, कमलेश महाजन, राजू महाजन, सरपंच मुरलीधर पाटील, तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)