रुळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:06 IST2019-05-27T22:05:49+5:302019-05-27T22:06:05+5:30

पाचोरा येथील घटना

Passing the cross while crossing the rails, the aged | रुळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून वृद्ध ठार

रुळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून वृद्ध ठार

पाचोरा : रेल्वेलाईन ओलांडताना झेलम एक्सप्रेस खाली सापडून एक जण जागीच ठार झाल्याची घटना पाचोरा शहराजवळील उड्डाणपुलाजवळ सोमवारी सकाळी ७.५० वाजता घडली.
या दुर्घटनेबाबत वृत्त असे की, भास्कर दगा पाटील (वय ६३, रा. शिंदाड, ह. मु. कृष्णापुरी पाचोरा) हे सकाळी आपल्या बहिणीच्या घराकडे तिला भेटण्यासाठी रेल्वे लाईन ओलांडून जात असताना उड्डाणपुलाजवळ अप लाईनवर पुण्याकडे जाणाऱ्या झेलम एक्सप्रेसखाली सापडून ते जागीच ठार झाले. भास्कर पाटील यांना ऐकायला कमी येत असल्याने झेलम एक्सप्रेसच्या लोकोपायलटने हॉर्न वाजवूनही त्यांना ऐकायला आले नाही. ऐकायलाही व्यवस्थित येत नसल्याने हॉर्न वाजूनही गाडी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांचेही गाडी कडे दुर्लक्ष होते. यामुळेच हा अपघात झाला. लगेचच ही घटना लोकांच्या व रेल्वे पोलिसांच्याही लक्षात आली. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत असून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. दरम्यान नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Passing the cross while crossing the rails, the aged

टॅग्स :Accidentअपघात