जळगाव : भुसावळहून जळगावला शिकण्यासाठी येणाºया विद्यार्थिनीची छेड काढणाºयाला युवकाला प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार, शनिवारी दुपारी जळगाव रेल्वे स्थानकासमोर घडला. चोप मिळत असतांना, तरुणाने विद्यार्थीनीची हात जोडून माफी मागितल्याने, तरुणाला समजूत देऊन सोडण्यात आले.भुसावळ येथून दररोज सकाळच्या काशी एक्सप्रेसने पीडित विद्यार्थीनी जळगावला खाजगी क्लासेसला येत असते. तीन दिवसांपूर्वी या युवकाने स्टेशनवरुन नेहरु चौकाकडे येतांना तिला रस्त्यात अडविले. आपण एका मोबाईल कंपनीत मॅनेजर असल्याचे सांगत विद्यार्थीनीला मोबाईल नंबर दिला. पुन्हा दुसºया दिवशी दुचाकीवरुन आलेल्या या तरुणाने या विद्यार्थीनीला रस्त्यांत अडवित माहिती विचारली. विद्यार्थीनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी पुन्हा या तरुणाने विद्यार्थीनीला रस्त्यात अडवित छेड काढायला सुरुवात केली. यावेळी घाबरलेल्या विद्यार्थीनीने आजूबाजूच्या प्रवाशांना हा प्रकार सांगितल्यावर प्रवाशांनी चांगलीच धुलाई केली.
जळगावात विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला प्रवाशांकडून चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 19:12 IST
भुसावळहून जळगावला शिकण्यासाठी येणाºया विद्यार्थिनीची छेड काढणाºयाला युवकाला प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार, शनिवारी दुपारी जळगाव रेल्वे स्थानकासमोर घडला.
जळगावात विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला प्रवाशांकडून चोप
ठळक मुद्देजळगाव रेल्वे स्थानकासमोरील प्रकारयुवकाने माफी मागितल्याने नागरिकांनी सोडलेतरुणाला समजूत देऊन सोडण्यात आले.