शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

पाचोरा पीपल्स बँक अपहारप्रकरणी चेअरमनसह दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:17 AM

दि पाचोरा पीपल्स बँकेत ५५.३३ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन अशोक संघवी, संचालक किशोर शिरुडे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबँकेच्या सभासदाने दिलेल्या फिर्यादीवरून तक्रारइतरांच्या मदतीने अपहाराचा आरोप

पाचोरा, जि.जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यात विस्तार असलेल्या दि पाचोरा पीपल्स बँकेत ५५.३३ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन चेअरमन अशोक संघवी, संचालक किशोर शिरुडे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की, बँकेचे सभासद संदीप महाजन यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन बँकेचे अंतर्गत लेखा परीक्षण लेखापरीक्षक दिलीप गांधी यांनी केलेले आहे. यात त्यांनी अपहाराचा ठपका ठेवला. त्यात तात्कालीन चेअरमन अशोक संघवी, तत्कालीन सीईओ नितीन टिल्लू व तत्कालीन लेखा परीक्षक बी.एस. फडणवीस अँड असोसिएट नाशिक यांचा प्रामुख्याने यात सहभाग असल्याचा आरोप केला आहे.चेक डिस्काऊंटींग या प्रकारात व तत्कालीन चेअरमन व इतरांनी अफरातफर केली असून रिझर्व बँकेच्या नियमानुसार चेक डिस्काऊंटींगला परवानगी नाही. मात्र बँकेत अशा प्रकारच्या चेकच्या माध्यमातून बनावट धनादेश सादर करून लाखो रुपये वापरल्याचे लेखा परीक्षणातून दिसून आले आहे. पाचोरा पीपल्सच्या एचडीएफसी बँकेतील खात्यावरून हा घोळ स्पष्टपणे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.यात पुढे म्हटले आहे की, काही कर्जदार खातेधारकांमधील मंडळी ही बँकेचे तत्कालीन चेअरमन आणि संचालकांचे निकटवर्तीय आहे. यामुळे १ एप्रिल २०१८ ते ९ नोव्हेंबर २०१८ या कालखंडात तत्कालीन चेअरमन अशोक संघवी व संचालक किशोर शिरूडे यांनी इतरांच्या मदतीने सुमारे ५५.३३ लाख रूपयांचा अपहार केला आहे. याशिवाय, फेब्रुवारी २०१९ पासून बँकेवर प्रशासक असतांनाही अशोक संघवी व नितीन टिल्लू यांनी सुधारणेच्या नावावर ठेकेदारांना मोठ्या रकमेची बिले अदा केली आहेत. यात सर्वांनी एकत्रितपणे ३,५४,८५४ रुपये प्रदान केले आहेत. तत्कालीन चेअरमन यांच्या नातेवाईकांना वाढीव दराने व्याज प्रदान केले असून कर्जावर मात्र कमी व्याजाची आकारणी केली आहे, असा आरोप केला आहे. म्हणून पाचोरा पोलिसात भाग पाच, गु.र.नं २७२/१९, भादवि ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६८, ४७१, ४४७ असह १२० बप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPachoraपाचोरा