शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 2:04 AM

१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले महाजन आता सलग सहाव्यांदा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे.

मोहन सारस्वत जामनेर : राज्य सरकारचे ‘संकटमोचक’अशी प्रतिमा असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील लढत राज्यातील चुरशीच्या लढतीपैकी एक व्हावी, असा विरोधकांचा प्रयत्न आहे. महाजन यांना कोंडीत पकडण्यासाठी यंदा स्थानिक विरोधकांना राज्यातील नेत्यांची सर्व प्रकारची मदत मिळणार आहे.

१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले महाजन आता सलग सहाव्यांदा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने कधी स्वतंत्र तर कधी आघाडी करून त्यांच्या विरोधात उमेदवार दिला. २०१४ मध्ये कॉँग्रेसकडून संजय गरुड व डिगंबर पाटील इच्छुक असताना पक्षाने ज्योत्स्ना विसपुते यांना उमेदवारी दिल्याने गरुड व पाटील यांनी कॉँग्रेस सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ ‘हाता’वर बांधले. पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने तिरंगी लढतीत महाजन पाचव्यांदा निवडून आले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जामनेर नगरपरिषद निवडणुकीत सर्व जागा भाजपने जिंकल्या तर संजय गरुड यांच्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीतही भाजपने बहुमत मिळविले. महाजन यांचा करिष्मा दिसून आला.

भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश पाहता जिल्ह्यातील सर्वच जागांवर विजयाचा दावा महाजन यांच्याकडून केला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष संपवायला निघालेल्या महाजन यांच्या मतदारसंघातील विरोधक आक्रमक असल्याने लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर पक्षात महाजन यांचे वजन वाढले. विरोधकांना आपलेसे करून त्यांना भाजपत घेण्यात हातखंडा असल्याने इनकमिंगचे प्रणेते संबोधले जाते. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्राची धुरा त्यांच्याकडे असल्याने त्यांना आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देता आले नाही, परिणामी शहरातून भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. अल्पसंख्य समाज काही अंशी दुरावल्याने त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न गेल्या तीन महिन्यात झाला.पाच वर्षात काय घडले?

  • टेक्सटाईल पार्कच्या कामास गती
  • वाघूर धरणावरील उपसा सिंचन योजना पूर्णत्वाकडे
  • सुगंधी वनस्पती संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा उपलब्ध
  • तालुक्यात पक्के डांबरी रस्त्यांचे जाळे, ४८ कोटींच्या कामांना सुरुवात
  • दोन नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी
  • पहूर, शेंदुणीसाठी वाघूर धरणातून पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

 

गिरीश महाजन यांना जलसंपदा हे महत्त्वाचे खाते मिळूनदेखील तालुक्यातील १३५ गावातील नागरिक गेल्या वर्षी तहानलेलेच राहिले. टेक्सटाईल पार्कच्या नावे फसवणूक केली. -संजय गरुड, नेते, राष्ट्रवादीसंभाव्य प्रतिस्पर्धीसंजय गरुड, अभिषेक पाटील, बंगालीसिंग चितोडिया, अ‍ॅड.ज्ञानेश्वर बोरसे (राष्ट्रवादी)शंकर राजपूत,शरद पाटील (काँग्रेस)डॉ.मनोहर पाटील, दीपक राजपूत (शिवसेना)

टॅग्स :jamner-acजमनेरGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019