पतीवर उपचार करून परतताना पत्नीवर काळाची झडप; खांबावर कार धडकून महिला ठार, तीन जण जखमी

By विजय.सैतवाल | Updated: December 2, 2023 14:33 IST2023-12-02T14:33:05+5:302023-12-02T14:33:14+5:30

पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणारे सुनील हसकर (रा. रावेर) यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

One Woman killed, three people injured in car accident at jalgaon | पतीवर उपचार करून परतताना पत्नीवर काळाची झडप; खांबावर कार धडकून महिला ठार, तीन जण जखमी

पतीवर उपचार करून परतताना पत्नीवर काळाची झडप; खांबावर कार धडकून महिला ठार, तीन जण जखमी

जळगाव : नाशिक येथे पतीवर उपचार करून रावेर येथे गावी परतत असताना खांबावर कार धडकल्याने सावित्री सुनील हसकर (५०, रा. रावेर) या जागीच ठार झाल्या. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवार, २ डिसेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव ते नशिराबाद दरम्यान टोल नाक्यानजीक झाला. 

पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणारे सुनील हसकर (रा. रावेर) यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. त्यासाठी ते अधून-मधून तेथे जात असतात. शुक्रवारी उपचार घेऊन रात्री नाशिक येथून रावेर येथे ते कारने परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सावित्री हसकर, अन्य एक महिला व मित्र होते. कार नशिराबाद टोलनाक्यानजीक पोहचली त्या वेळी ती एका खांबावर धडकली. त्यात सावित्री हसकर या जागीच ठार झाल्या. तसेच चालकाचा हात व पाय फॅक्चर झाला आहे तर अन्य दोघांनाही मार लागला आहे. 
मयत महिलेच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: One Woman killed, three people injured in car accident at jalgaon