भडगाव पाचोरा रोडवर टोणगावजवळ ट्रकने एकास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 19:40 IST2021-02-06T19:39:19+5:302021-02-06T19:40:27+5:30
भरधाव ट्रकने एका प्रौढाला धडक देऊन मागील चाकात चिरडल्याची घटना टोणगावजवळ घडली.

भडगाव पाचोरा रोडवर टोणगावजवळ ट्रकने एकास चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : पाचोरा येथून भडगावकडे येत असलेल्या भरधाव ट्रकने एका प्रौढाला धडक देऊन मागील चाकात चिरडल्याची घटना भडगाव शहरातील टोणगावजवळ दि. ६ रोजी सकाळी ७.३० वाजता घडली.
पाचोरा येथून भडगावकडे येणाऱ्या भरधाव ट्रक (एमएच १८/बीजी५३२५) या ट्रकवरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत पायी चालणाऱ्या रामभाऊ दत्तू भिल (४०, कराब, भडगाव) याला धडक देत मागच्या चाकात चिरडले. यामध्ये रामभाऊ भिल याचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाला.
विनोद पांडुरंग भिल (कराब) याच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश शिवाजी पाटील (गोराडखेडा, पाचोरा) याच्याविरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला भा. दं. वि. कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार व्हेईकल ॲक्ट १८४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. किरण ब्राम्हणे हे करीत आहे. याबाबत चालकाला ट्रकसहीत भडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.