वाडे येथील एकाची कजगाव येथे आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:44 IST2020-10-22T12:43:16+5:302020-10-22T12:44:42+5:30
वाडे येथील एकाने आत्महत्या केली.

वाडे येथील एकाची कजगाव येथे आत्महत्या
भडगाव : तालुक्यातील वाडे येथील ५२ वर्षीय इसमाने कजगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २१ रोजी घडली. निंब रामदास पाटील असे या इसमाचे नाव आहे.
याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अरविंद फकीरा पाटील पोलीस पाटील रा.वाडे यांनी माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी कि, निंबा रामदास पाटील (वय ५२ वर्ष, रा.वाडे, ता.भडगाव) या इसमाने कजगाव-गोंडगाव रोडवरील नवीन लॉन्सच्या किचन रुमच्या बांधकाम सुरू असलेल्या पत्री शेडच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून फळफास घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे करीत आहेत.