शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

एका नवºयाच्या दोन बायकांमध्ये ‘फ्री-स्टाईल’

By admin | Updated: March 6, 2017 01:09 IST

पोलीस ठाण्यातच वाद : नवºयासह दोन्ही बायकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

जळगाव : ‘दोन बायका अन् फजिती ऐका’ या मराठी चित्रपटातील कथेशी मिळती-जुळती घटना शहरातील एका कुटूंबात असून दोन बायकांमधील हा वाद रविवारी शहर पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला. शब्दामागे शब्द वाढल्याने पोलिसांसमक्षच दोन्ही बायकांमध्ये फ्रि स्टाईल  झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन ही हाणामारी सोडविली. दरम्यान, मुळ वाद बाजूला राहिला व या बायकांसह त्यांच्या नवºयाविरुध्द पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.एका नवºयाच्या दोन बायका रविवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात परस्पराविरूध्द तक्रार देण्यासाठी आल्या होत्या.शहरातील सुधीर या तरुणाचे काही वषापूर्वी पूजा (तिघांचे नाव बदलले आहे) तरुणीशी विवाह झाला होता. मात्र, तिला लग्नानंतर काही वर्षातच नवºयाने माहेरी पाठवून दिले होते.  त्यानंतर त्याने धनश्री या तरुणीशी लग्न केले. पूजाला एक मुलगा आहे. तीन-चार दिवसांपूर्वी पूजा ही मुलाला घेवून सुधीर याच्याकडे आली व मुलाचा सांभाळ करावा अशी मागणी केली. त्यावरुन पूजा व धनश्री या दोघींमध्ये वाद झाले. रविवारी दुपारी साडे बारा वाजता पूजा ही नात्यातील तालुक्यातील एका गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेला सोबत घेऊन शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. त्यापाठोपाठ सुधीर व त्याची धनश्री  देखील तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले.पूजा तक्रार देत असतांना धनश्री हिने तिच्याशी वाद घालत कानशिलात लगावली. त्यानंतर पूजाने लगावली. दोघांमध्ये इतका वाद झाला की एकमेकीचे केस ओढून त्यांनी जमिनीवर पाडले. हा प्रकार पाहून पोलीसही अचंबित झाले. शेवटी पोलिसांनी दोन्ही बायकांसह तिच्या नवºयाविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केली. यानंतर तिघांना तेथून रवाना करण्यात आले.