यावल रस्त्यावर प्रवासी रिक्षा उलटल्याने एक ठार, चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 17:45 IST2017-12-29T17:43:00+5:302017-12-29T17:45:28+5:30

प्रवासी वाहतूक करणारी तीन चाकी रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात फैजपूर येथील मधुकर इच्छाराम सोनवणे (वय ७८) हे वृद्ध जागीच ठार झाले.

One killed, four injured in road accidents | यावल रस्त्यावर प्रवासी रिक्षा उलटल्याने एक ठार, चार जण जखमी

यावल रस्त्यावर प्रवासी रिक्षा उलटल्याने एक ठार, चार जण जखमी

ठळक मुद्देरिक्षा उलटल्याने झाला अपघातमधुकर सोनवणे यांचा जागीच मृत्यूअपघातात चार जण जखमी

आॅनलाईन लोकमत
हिंगोणे, ता.यावल : प्रवासी वाहतूक करणारी तीन चाकी रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात फैजपूर येथील मधुकर इच्छाराम सोनवणे (वय ७८) हे वृद्ध जागीच ठार झाले. रिक्षा चालकासह चार जण जखमी झाले. हा अपघातात शुक्रवारी फैजपूर-यावल रस्त्यावर हिंगोणे गावाजवळ सकाळी ११ वाजता घडला.
हंबर्डी येथील नेहेते यांच्या मालकीची रिक्षा क्रमांक एमएच-१९-बीटी-०८६३ फैजपूरकडून यावलकडे जाताना हिंगोणे गावाजवळ अचानक पलटी झाली. यावेळी झालेल्या अपघातात मधुकर सोनवणे हे जागीच ठार झाले. रिक्षा चालक हेमंत पंडीत नेहेते (वय २३), निकेता हेमंत नेहेते (वय २०), रा.हंबर्डी, शुभम रवींद्र सोनवणे (वय २०) रा. फैजपूर, दत्तात्रय राजू भारंबे (वय ५) हे जखमी झाले. जखमींवर फैजपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
सोनवणे यांचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. किरण चाटे मालवीय आदी तपास करीत आहेत.

Web Title: One killed, four injured in road accidents