मळनेरात तंबाखू न दिल्याने एकाचा दगडाने ठेचून खून; नाशिकच्या एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 11:18 IST2025-09-22T11:17:30+5:302025-09-22T11:18:06+5:30
दिनेश भिका धनगर याने फिर्याद दिली की, 'त्याचा भाऊ मुकेश धनगर हा रात्री ११ वाजता घराबाहेर गेला होता. हेडावे नाक्यावर त्याचे कोणाशी तरी भांडण झाल्याचे त्याता कळाले.

मळनेरात तंबाखू न दिल्याने एकाचा दगडाने ठेचून खून; नाशिकच्या एकाला अटक
अमळनेर( जि जळगाव) : तंबाखू न दिल्याच्या कारणावरून एकाने ३८ वर्षीय मुकेश धनगर याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना २१ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. निखिल विष्णू उतकर (४५, रा. पंचवटी, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. 'त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दिनेश भिका धनगर याने फिर्याद दिली की, 'त्याचा भाऊ मुकेश धनगर हा रात्री ११ वाजता घराबाहेर गेला होता. हेडावे नाक्यावर त्याचे कोणाशी तरी भांडण झाल्याचे त्याता कळाले. घटनास्थळी जाऊन पाहिले असता दोघांमध्ये तंबाखू दिली नाही यावरून वाद सुरू होता. दिनेश त्यांचे भांडण सोडवायला गेला असता आरोपीने त्यालाही दगड मारला. म्हणून तो घरी जाऊन त्याच्या भावाना बोलवायला गेला. परत येऊन बघितले असता आरोपी निखिल उतकर हा मुकेशच्या डोक्यात दगडाने डोक्यात व तोंडावर मारत होता. मुकेशला सोडवून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.