जळगाव जिल्हयात तीन अपघातात एक ठार, ३० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 20:57 IST2019-05-01T20:56:02+5:302019-05-01T20:57:02+5:30
जळगाव जिल्हयात तीन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार आणि ३० जण जखमी झाले.

जळगाव जिल्हयात तीन अपघातात एक ठार, ३० जखमी
चोपडा - शिरपूर रस्त्यावर ट्रक उलटून एक ठार, १८ जण जखमी झाले. बुधवारी दुपारी हा अपघात झाला. पाचोरा शहरानजीक चारचाकी वाहन उलटून सहा जण जखमी झाले. सायंकाळी ही घटना घडली. तिसरी घटना यावलनजीक सायंकाळी ७ वाजता वाहन उलटून सहा आदिवासी जखमी झाले.