गणेश विसर्जनात क्रेन उलटून एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 08:54 PM2019-09-08T20:54:22+5:302019-09-08T20:54:27+5:30

चहार्डीच्या खदानीजवळची घटना : भल्या मोठ्या मूर्त्यांमुळे निर्माण झाल्या अडचणी

One injured in a crane reversal | गणेश विसर्जनात क्रेन उलटून एक जखमी

गणेश विसर्जनात क्रेन उलटून एक जखमी

Next


चोपडा : शहरातील विसर्जन मिरवणुकीतील गणपती मूर्ती चहार्डी येथील खदानीच्या पाण्यात क्रेनच्या साहाय्याने विसर्जित करताना क्रेन ऊलटून एक जण जखमी झाला. ही घटना ८ रोजी सकाळी घडली.
येथील नवनाथ मित्र मंडळाची मुर्ती विसर्जीत करत असताना ही घटना घडली. यात चहार्डी येथील कैलास पाटील हा युवक जखमी झाला. या खदानस्थळी लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता ८ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत भल्या मोठ्या गणेश मुर्त्यांमुळे विसर्जन करणे अडचणीचे ठरत होते. ६ रोजी मिरवणूक निघाली होती. मिरवणूक जवळपास वेळेत थांबली तरी जास्तीत जास्त मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी ७ रोजीच विसर्जन होणे अपेक्षित होते मात्र ८ रोजी सायंकाळ पर्यंत विसर्जन चालले. भव्यदिव्य मूर्त्यांची प्रतिष्ठपना केल्याने विसर्जनाला अडचण निर्माण झाली म्हणून यापुढे भव्यदिव्य मुर्त्या आणण्यापेक्षा लहान मूर्ती बसवाव्यात आणि समाज प्रबोधनपर सजीव देखाव्यांवर भर द्यावा, असा सूर काही गणेश मंडळांच्या कार्यर्त्यांकडून व जाणकारांकडून निघत आहे.
या अपघातामुळे अनेक मंडळाच्या गणपती मूर्ती विसर्जित करण्याचे रखडल्याने मुर्त्या चहार्डी वेले रस्त्यावरच बराच वेळ उभ्या केल्या होत्या. तर काही गणेश मंडळांनी निमगव्हाण येथील तापी नदीला भरपूर पाणी असल्याने तापीच्या पुलावरूनच मुर्त्या फेकून विसर्जन केले. हेही अनेकांच्या मनाला बोचणारे ठरले.
पोलीस हवालदाराचा गौरव
६ रोजी गणपती विसर्जनावेळी रात्रभर जबाबदारीने चोख भूमिका निभावली म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील हवालदार लक्ष्मण शिंगाने यांचे मिरवणूक आटोपल्यानंतर पालिकेसमोरील पटांगणात पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गौरव केला. अधिकृत गौरवपत्र पाठविले जाईल, असे जाहीर केले. तसेच शेतकी संघाचे माजी अध्यक्ष हिम्मतसिंग पाटील यांनीही सहकार्य केले.
चोपडा पालिकेने विसर्जनासाठी करावी व्यवस्था
चोपडा शहरातील भव्यदिव्य गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेने व्यवस्था करावी, अशी मागणी गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच मंडळांकडून पालिकेने प्रत्येकी २०० रुपये घेतले असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले. चहार्डी येथील खदानीजवळ क्रेन उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही पालिकेची असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Web Title: One injured in a crane reversal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.