कराडी व हिंगोणा येथील १४२ शेतकऱ्यांसाठी एक कोटी आठ लाखाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:37 PM2020-02-26T22:37:32+5:302020-02-26T22:38:17+5:30

उर्वरित ९२ पैकी ८२ शेतकऱ्यांची आधार पडताळणी, बँकांकडे निधी वर्ग होऊन मिळणार शेतकºयांना लाभ

One crore eight lakh funds for two farmers in Karadi and Hingona | कराडी व हिंगोणा येथील १४२ शेतकऱ्यांसाठी एक कोटी आठ लाखाचा निधी

कराडी व हिंगोणा येथील १४२ शेतकऱ्यांसाठी एक कोटी आठ लाखाचा निधी

Next

जळगाव : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणे या दोन गावातील पात्र शेतक-यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दोन्ही गावातील एकूण १४२ शेतक-यांसाठी १ कोटी आठ लाख ६६ हजार ७२८ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा बँकेकडे प्राप्त हा निधी संंबंधित गावातील बँकांच्या शाखांकडे वर्ग होऊन तो गुरुवारी शेतकºयांच्या खात्यात जमा होऊ शकतो. दरम्यान, आधार पडताळणी न झालेल्या उर्वरित ९२ पैकी ८२ शेतकºयांचीही आधार पडताळणी झाली आहे.
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा लवकरात लवकर लाभ देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणे या दोन गावातील एकूण २०५ पात्र शेतकºयांची यादी सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी प्रायोगिक तत्वावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी ११३ शेतकºयांनी पहिल्याच दिवशी तातडीने आधार पडताळणीही पूर्ण केली होती. यात ९२ शेतकºयांची आधार पडताळणी बाकी होती. त्या पैकी ८२ शेतकºयांनी २६ फेब्रुवारी अखेर पडताळणी केल्याने आता पर्यंत २०५पैकी १९५ शेतकºयांची आधार पडताळणी पूर्ण झाली. काही जण बाहेरगावी असल्याने उर्वरित १० शेतकºयांची पडताळणी होणे बाकी आहे. यात कराडी जिल्हा बँक शाखेच्या एक, हिंगोणे जिल्हा बँक शाखेच्या आठ व दोन्ही तालुक्यातील इतर बँक शाखांच्या एका शेतकºयांची आधार पडताळणी होणे बाकी आहे. राहिलेली आधार पडताळणीदेखील लवकरच पूर्ण होईल, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.
१४२ शेतकºयांसाठी निधी
पात्र शेतकºयांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व आधार पडताळणी झाल्यानंतर हिंगोणे व कराडी या दोन गावातील १४२ शेतकºयांसाठी १ कोटी आठ लाख ६६ हजार ७२८ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये हिंगोणे येथील ७६ तर कराडी येथील ६६ शेतकºयांचा समावेश आहे. हा निधी संबंधित बँक शाखांमध्ये वर्ग होऊन गुरुवारी हा निधी शेतकºयांच्या खात्यात जमा होण्याचा विश्वास जिल्हा उप निबंधक मेघराज राठोड यांनी व्यक्त केला.

Web Title: One crore eight lakh funds for two farmers in Karadi and Hingona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव