भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 19:37 IST2019-11-20T19:36:49+5:302019-11-20T19:37:24+5:30
भुसावळ शहरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह विकास देवीदास सपकाळे (वय ४०, रा.हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यास बुधवारी दुपारी एकला पकडण्यात आले.

भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक
भुसावळ, जि.जळगाव : शहरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह विकास देवीदास सपकाळे (वय ४०, रा.हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यास बुधवारी दुपारी एकला पकडण्यात आले.
शहरातील रेल दुनिया परिसरातील भुसावळ हायस्कूलजवळ एका संशयिताजवळ कट्टा असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विकास देवीदास सपकाळे याच्या मुसक्या आवळल्या. गावठी कट्टा पकडण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे, तर गावठी कट्ट्यांचा पुन्हा उत आला की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आरोपीच्या ताब्यातून १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व ५०० रुपये किमतीचे काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई उपअधीक्षक गजाजन राठोड व पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, उपनिरीक्षक वैभव पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहम्मद अली सय्यद, हवालदार आशा तडवी, नाईक सुनील सैंदाणे, कॉन्स्टेबल समाधान पाटील, भूषण चौधरी, जितू सोनवणे, मोहन पाटील, विशाल साळुंखे , संजय पाटील आदींच्या पथकाने केली. जितेंद्र सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध आर्म अक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मोहम्मद अली सय्यद करीत आहेत.