Video: बाबो! सर्पमित्र, आमदार गिरीश महाजन यांनी पकडला पाच फूट लांबीचा साप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 22:24 IST2021-07-20T22:16:59+5:302021-07-20T22:24:25+5:30

Girish Mahajan news: गिरीश महाजन सोनबर्डीवरील सोनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन घराकडे येत होते. त्यावेळी त्यांना  शहरातील सुपारी बागेसमोर वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसली.

OMG! MLA Girish Mahajan caught a five feet long snake in Jamner, Video went viral | Video: बाबो! सर्पमित्र, आमदार गिरीश महाजन यांनी पकडला पाच फूट लांबीचा साप

Video: बाबो! सर्पमित्र, आमदार गिरीश महाजन यांनी पकडला पाच फूट लांबीचा साप

जामनेर जि. जळगाव : माजी मंत्री व  भाजप नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची सर्पमित्र अशी ओळख आहे. आज रात्री त्यांनी पाच फूट लांबीचा साप पकडला आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला. (Girish Mahajan caught snake in Jamner.)

मंगळवारी रात्री आठ वाजता गिरीश महाजन सोनबर्डीवरील सोनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन घराकडे येत होते. त्यावेळी त्यांना  शहरातील सुपारी बागेसमोर वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसली. काही भांडण तर झाले नसावे यासाठी ते थांबले असता सुमारे पाच फुट लांबीचा साप रस्ता ओलांडत होता. वाहनाखाली चिरडून साप मारला जाऊ शकतो, हे लक्षात घेत महाजन वाहनातून खाली उतरले. 

सापाला पकडत असताना तो काहीवेळा त्यांच्या हातातून निसटत होता. काठीच्या आधारे त्यांनी अखेर सापाला पकडले. यावेळी त्यांना अन्य एका-दोघांनी मदत केली. हा साप पळासखेडे बुद्रुक येथील जंगलात सोडण्यात आला. महाजन यांच्या भुतदयेचा प्रत्यय पुन्हा एकदा जामनेरकर  नागरिकांनी अनुभवला.

Web Title: OMG! MLA Girish Mahajan caught a five feet long snake in Jamner, Video went viral