पिंपळगावत क्षुल्लक कारणावरून व्रुध्द महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 14:26 IST2019-09-12T13:46:49+5:302019-09-12T14:26:26+5:30
पिंपळगाव कमानी तांडा ता जामनेर येथील रहिवासी भोजराज सावजी राठोड याने क्षुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण( ६०) या व्रुध्द महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका टाकल्याने गतप्राण झाल्याची द्रुदैवी घटना गुरवारी साकाळी आठ वाजता घडल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.

पिंपळगावत क्षुल्लक कारणावरून व्रुध्द महिलेचा मृत्यू
जळगाव: पिंपळगाव कमानी तांडामधील रहिवासी भोजराज सावजी राठोड या व्यक्तीने एका क्षुल्लक कारणावरून शांताबाई मदन चव्हाण( ६०) या व्रुध्द महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका टाकल्याने मृत्यू झाल्याची द्रुदैवी घटना गुरवारी सकाळी आठ वाजता घडल्याचे समोर आले आहे. तसेच या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पहूर पोलीस संबधीत युवकाचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
माहितीनुसार, अंगणात बैल गाडी सोडण्याच्या कारणावरून शांताबाई मदन चव्हाण व भोजराज सावजी राठोड यांच्यात भांडण होऊन हाणामारीत रुपांतर झाल्याची घटना घडली. यादरम्यान भोजराज याने या महिलेच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने महिला जमीनीवर कोसाळून प्रचंड रक्त स्त्राव झाला. पहूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान घटनास्थळी सपोनि राजेश काळे यांनी तातडीने धाव घेऊन परीस्थिती वर नियंत्रण ठेवले आहे. तसेच भोजराज याचा पोलीस शोध घेत असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेश काळे यांनी दिली आहे. याघटनेने खळबळ उडाली आहे.