दुचाकीला कंटेनरची धडक बसल्याने भुसाळातील वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:09 IST2017-12-12T16:04:58+5:302017-12-12T16:09:34+5:30

विरावली येथे नातवाच्या लग्नासाठी जात असताना चोपडा रस्त्यावर घडली घटना

The old man killed in a wheelchair after the container was hit | दुचाकीला कंटेनरची धडक बसल्याने भुसाळातील वृद्ध ठार

दुचाकीला कंटेनरची धडक बसल्याने भुसाळातील वृद्ध ठार

ठळक मुद्देनातवाच्या लग्नाला जात असताना झाला अपघातकंटेनरने जोरदार धडक दिल्याने झाला अपघातकंटेनर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमत
यावल,दि.१२ : तालुक्यातील विरावली येथे नातवाच्या लग्नासाठी दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीस कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वराडसीम ता. भुसावळ येथील मुळ रहिवासी व सध्या भुसावळातील शांतीनगरात रहिवासी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी माधव दगडू पाटील (वय ७७) हे ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील ख्वॉजा मशिदीजवळ घडली.
माधव पाटील हे दुचाकी क्रमांक एम. एच. १९- बीपी-५४९५ ने जात असतांना शहरातील चोपडा रस्त्यावरील ख्वॉजा मशिदीजवळ त्यांच्या दुचाकीला समोरुन येणााºया कंटेनरने क्र.एच. आर. ६१-बी १३८४ ने जबर धडक दिली. यात पाटील गंभीर जखमी झाले. परिसरातील लोकांनी धाव घेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र त्यांचे निधन झाले. अरुण सीताराम पाटील यांच्या फिर्यादी वरून पोलीस ठाण्यात अनोळखी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रा.का.पाटील करीत आहेत.

Web Title: The old man killed in a wheelchair after the container was hit