शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध होती तरणे रे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:26 IST

‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ या संतांचा जयघोष आजही अनेक शतकानंतर सर्वार्थाने केला जातो. हे खूपच वैशिष्टपूर्ण ...

‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ या संतांचा जयघोष आजही अनेक शतकानंतर सर्वार्थाने केला जातो. हे खूपच वैशिष्टपूर्ण आहे. त्यातील मौलिक अर्थ असा आहे की, हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थीर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।। या ज्ञानेश्वरीतील विशाल विचारांचा आदर्श घेत संत परंपरा अनेक आक्रमणे व आघात स्वीकारत आपले अस्त्तित्व अबाधित ठेवून जन प्रबोधन करीत शतकानुशतके विठ्ठल भक्तीचा संदेश देत आहे.‘ज्ञानदेवे रचिला पाया ...... तुका झालासे कळस’ या अभंगातील संत इमारत अनेक शतकांच्या वैचारिक पातळीत खोलवर वारकरी तत्व रुजवणारी आहे. आजही विठ्ठल भक्तीचा आनंद यात्रेत अर्थात पंढरीच्या वारीत अनेक धर्म, पंथ, जाती ह्या एकरूप झालेल्या असतात. या पंढरीच्या वारीचे अनेक संतांनी वर्णन केले आहे. त्यात संत नामदेवराय सांगतात की,पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ।।संत ज्ञानोबाराय म्हणतात की,माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।आणि त्याच वारीचे वर्णन संत तुकोबाराय करतात की,उदंड पाहिले, उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ।।ऐसी चंद्रभागा, ऐसे भिमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ।।ऐसे संत जन, ऐसे हरीदास । ऐसा नामघोष सांगा कोठो ।।याप्रमाणे वारीचे श्रेष्ठत्व विविध संतांनी अधोरेखित केले आहे.आता पंढरपूरकडे जाण्यासाठी वारकरी आतुर झालेले आहेत. म्हणून पंढरीची वारी आता आंतरराष्टÑीय वारी झालेली आहे. वारकरी आपले भौतिक वैभव विसरून वारीसाठी तळमळ करीत आहेत. म्हणूनच संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरिचा ।।आपल्या खान्देशातून अनेक दिंड्यांची परंपरा कायम आहे. आजही अनेक दिंडी सोहळे पंढरपूरला जात असतात.पंढरीच्या वारीचे वैशिष्ट- ज्याला भूक लागत नाही, त्याने वारीत यावे.- ज्याला झोप लागत नाही, त्याने वारीत यावे.-ज्याला शारीरिक व्याधी आहे, त्याने वारीत यावे.मंडळी आपल्या घरी अतिशय सुग्रास भोजन असूनही ज्यांना भूक लागत नाही अशी माणसं वारीत २-२ भाकरी खातात. आणि घरी झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपत नाही. अशी माणसं वारीत दिवसा विसाव्यामध्ये घोरतात. आणि विशेष म्हणजे विविध शारीरिक व्याधी, दु:ख, विसरून वारीतील लोक अक्षरश: नाचतात ! फुगड्या खेळतात, ‘वृद्ध होती तरणे रे’ याप्रमाणे वारीमध्ये कायिक, वाचिक, मानसिक तपश्चर्या घडते.-विजय नामदेव भामरे, अध्यक्ष, सुकेश्वर देवस्थान.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव