अंगावर रॉकेल आतून देवगाव येथे वृद्धेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 02:05 PM2018-08-01T14:05:15+5:302018-08-01T14:05:37+5:30

Old ketchup suicide in Devgaon | अंगावर रॉकेल आतून देवगाव येथे वृद्धेची आत्महत्या

अंगावर रॉकेल आतून देवगाव येथे वृद्धेची आत्महत्या

Next

जळगाव : अंगावर रॉकेल ओतून स्वत:च जाळून घेत कलाबाई भास्कर पाटील (वय ६०) या वृध्देने आत्महत्या केल्याची घटना देवगाव, ता.जळगाव येथे मंगळवारी घडली.
कलाबाई या अ‍ॅड.जितेंद्र पाटील यांच्या आई होत्या. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कलाबाई या देवगाव येथे घरी असताना सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:लाच पेटवून घेतले. नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचार सुरु असताना दुपारी दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: Old ketchup suicide in Devgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.