या कार्यक्रमाला महावितरणच्या जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारुक शेख, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सबोर्डिनेट संघटनेचे उपाध्यक्ष पराग चौधरी, सहसचिव कुंदन भंगाळे, सहसचिव वाय. सी. भंगाळे, मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, मंडळ सचिव देवेंद्र भंगाळे, कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी, राजेंद्र मार्के, उपकार्यकारी अभियंता अजय वाणी, एस. के. पाटील, अतुल पाटील, आर. एफ. पवार, डी. पी. धांडे, केशव स्मृती सेवासंस्था समूहाचे सहप्रकल्प प्रमुख संजय काळे, प्रशासकीय अधिकारी सागर येवले, वृद्धाश्रमाचे पवन येपुरे उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी चेतन सोनार, एस. डी. चौधरी, अमोल चौधरी, हेमंत खांडेकर, पंकज बाविस्कर, हर्षल नेहेते, मोहन भोई, अविनाश पाटील यांनी परिश्राम घेतले. कार्यक्रमाचे आभार राहुल कुलकर्णी यांनी मानले.