चाचण्या वाढल्या, रुग्णसंख्येतही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:17 AM2021-05-06T04:17:47+5:302021-05-06T04:17:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेले दोन दिवस जिल्ह्यातील कोरोना चाचण्या घटल्या होत्या. तशी रुग्णसंख्या देखील कमी झाली होती. ...

As the number of tests increased, so did the number of patients | चाचण्या वाढल्या, रुग्णसंख्येतही वाढ

चाचण्या वाढल्या, रुग्णसंख्येतही वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेले दोन दिवस जिल्ह्यातील कोरोना चाचण्या घटल्या होत्या. तशी रुग्णसंख्या देखील कमी झाली होती. दोन दिवसांपासून ८०० च्या आसपास रुग्ण समोर येत होते. मात्र, बुध‌वारी पुन्हा एकदा दिवसभरातील चाचण्यांनी साडेअकरा हजारांचा टप्पा ओलांडला आहे, त्यासोबतच रुग्णसंख्या पुन्हा एकदा हजाराच्या टप्प्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी दिवसभरात १९१२ आरटीपीसीआर आणि ९६३१ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ११०४ अहवाल प्रलंबित आहेत. या अहवालांमधुन ९९९ नवे पॉझिटिव्ह समोर आले आहेत, तर १०३७ रुग्ण बरे झाले आहेत. बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या जिल्हाभरात ९७१२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील १२२७ रुग्ण हे ऑक्सिजनवर, तर ७४४ रुग्ण हे आयसीयूमध्ये आहेत.

अमळनेरमध्ये पुन्हा संसर्ग वाढला

बुध‌वारी अमळनेरमध्ये तब्बल १४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात १४४ रुग्ण हे अँटिजेन चाचणीतून समोर आले आहेत, तर मुक्ताईनगरला ६१, भुसावळला १३६ नवे बाधित आढळून आले आहेत. जळगाव शहरात १६० नवे बाधित समोर आले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कमी होत असलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे.

२५ हजार नवे टेस्टिंग कीट दाखल

जिल्ह्यात दोन दिवसांपासून टेस्टिंग कीटचा तुटवडा होता. आधीच्या कीट या दोन दिवस आणखी पुरतील. मात्र, आता २५ हजार कीट नव्याने दाखल झाल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. तसेच लवकरच आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढविणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाभरात अडीच हजार कंटेन्मेंट झोन

जिल्हाभरात सध्या ॲक्टिव्ह कंटेन्मेंट झोन हे २ हजार ५५३ आहेत. त्यापैकी ३६० झोन हे जळगाव शहरातच आहेत, तर ग्रामीण भागात १४०६ आणि इतर शहरांमध्ये ७८७ कंटेन्मेंट झोन आहेत.

Web Title: As the number of tests increased, so did the number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.