हंगाम वाया गेल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचे संकट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:27 IST2019-11-07T21:26:33+5:302019-11-07T21:27:29+5:30

चाºयाला बुरशी लागल्याने गुरांच्या आरोग्याचा प्रश्न : नवीन चाºयासाठी तीन महिन्यांची प्रतीक्षा

Now that the fodder scarcity crisis is facing the farmers after the season is over ... | हंगाम वाया गेल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचे संकट...

हंगाम वाया गेल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचे संकट...

जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा संपुर्ण खरीप हंगाम वाया गेल्यानंतर बळीराजा चिंतेत आहे. त्यातच मका, ज्वारी व दादरीच्या पीकासह चाºयाचेही नुकसान झाल्यामुळे आता शेतकºयांसमोर चारा टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या काही प्रमाणात हिरवळ असल्याने चाºयाची समस्या भागत असली तरी पुढील तीन महिने शेतकºयांना गुरांच्या चारा टंचाईचे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
दरवर्षी शेतकºयांकडून खरीप हंगामात गुरांच्या चाºयाची सोय व्हावी त्यासाठी मका, ज्वारी व दादरीचे पीक घेतले जाते. यातून शेतकºयांना धान्य ही मिळते व गुरांच्या चाºयांचा प्रश्न देखील मार्गी लागतो.
दरम्यान, यावर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामावर पाणी फेरले गेले. त्यातच मका, ज्वारी चे पीक देखील खराब झाल्यामुळे गुरांसाठी चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चाºयावर प्रक्रिया केली तर चारा ठरू शकतो फायद्याचा
चाºयाची कुट्टी देखील ओली झाली आहे. त्यावर बुरशी चढली आहे.
मात्र, या कुट्टीवर प्रक्रिया केली तर बुरशी निघून तो चारा गुरांसाठी फायद्याचा ठरु शकतो.
कुट्टीवर ५ लीटर पाणी मारून व त्यात ५ किलो गुळ, अर्धा किलो युरीयाचा वापर करून कुट्टी उन्हात सुकवून गुरांना खावू घातल्यास गुरांना कोणताही त्रास होत नसल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी प्रल्हाद चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

बुरशीयुक्त चारा गुरांसाठी धोकेदायक
पावसामुळे चारा पुर्णपुणे वाया गेला आहे. तसेच चाºयाला बुरशी लागल्यामुळे हा चारा गुरांसाठी अपायकारक ठरत आहे. सध्या हिरवळ असल्याने शेतकºयांकडून मोकळ्या मैदान किंवा शेतात गुरांसाठी चाºयांचा प्रश्न भागवत असले तरी पुढील दिवसात चाºयाचा भिषण प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवीन चाºयासाठी शेतकºयांकडून रब्बी हंगामात पीकांची लागवड केली जाईल. मात्र, हे पीक येण्यासाठीही तीन महिन्यांचा काळ लागेल. त्यामुळे तीन महिने गुरांसाठी चारा आणावा तरी कोठून असा प्रश्न निर्माण होत आहे.

बुरशीयुक्त चारा गुरांनी खाल्ल्यास गुरांना त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या किडनीवर परिणाम होवून गुरे दगावण्याचीही भिती असते. तसेच हा चारा गुरे देखील खाणे टाळतात.
-प्रल्हाद चौधरी,
पशु वैद्यकीय अधिकारी

Web Title: Now that the fodder scarcity crisis is facing the farmers after the season is over ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.