आता 'निकाला'लाही सुरूवात ; 'एम. फार्मसी, जीएसटी'चा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 05:23 PM2020-10-20T17:23:39+5:302020-10-20T17:23:55+5:30

९५ टक्के दिली नवव्या दिवशी परीक्षा : ऑफलाईन परीक्षांचे निकाल लवकरच

Now begins the 'result'; 'M. Pharmacy, GST results announced | आता 'निकाला'लाही सुरूवात ; 'एम. फार्मसी, जीएसटी'चा निकाल जाहीर

आता 'निकाला'लाही सुरूवात ; 'एम. फार्मसी, जीएसटी'चा निकाल जाहीर

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष,अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या नवव्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत ९५ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत या परीक्षा सुरु होत्या. दरम्यान, आता ऑनलाईन परीक्षांचे निकाल जाहीर होण्‍यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी एम. फार्मसी आणि जीएसटी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आहेत. लवकरच ऑफलाईन परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १२ ऑक्टोबर पासून सुरू झाल्या आहेत. मंगळवारी परीक्षेचा नववा दिवस होता. मंगळवारी विविध विद्याशाखांच्या १९६ विषयांच्या परीक्षा होत्या. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या परीक्षांच्या विविध सत्रात ८ हजार ५३० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे दिली तर या सत्रात २३०० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली.

सीईटीमुळे काही परीक्षा पुढे ढकलल्या
बी.एड., एम.पी.एड. व एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या सी.ई.टी. परीक्षांमुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या २१ तसेच २२, २३ तसेच २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून सुधारीत तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

अशा आहेत सुधारित तारखा
महाराष्ट्र शासनाने बी.एड., एम.पी.एड. व एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या सी.ई.टी. परीक्षांचे तसेच त्यानंतर या अभ्यासक्रमांच्या फिल्ड टेस्ट चे आयोजन जाहीर केले असल्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (नियमित व बॅकलॉगसह) विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यार्थी हित लक्षात घेवून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा या आता १ नोव्हेंबर रोजी तर २२ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी, २३ ऑक्टोबरची परीक्षा १० नोव्हेंबर रोजी, २८ ऑक्टोबरची परीक्षा ११ नोव्हेंबर रोजी आणि २९ ऑक्टोबरची परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी त्याच वेळेस ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत. ऑफलाईन परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर होतील अशी माहिती संचालक बी.पी. पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Now begins the 'result'; 'M. Pharmacy, GST results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.