अधिवेशनात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या एकाही प्रश्नाला न्याय मिळाला नाही; एकनाथ खडसेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 16:47 IST2022-12-31T16:47:22+5:302022-12-31T16:47:34+5:30
गंभीर प्रश्नाबाबत सरकारही असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

अधिवेशनात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या एकाही प्रश्नाला न्याय मिळाला नाही; एकनाथ खडसेंची टीका
अधिवेशनात एकमेकांवर आरोप करण्यातच फक्त वेळ गेला. अधिवेशनात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या एकाही प्रश्नाला न्याय मिळाला नाही
महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या कोणत्याच प्रश्नाला या ठिकाणी विचारले नाही. गंभीर प्रश्नाबाबत सरकारही असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, आज सातत्याने एकच प्रश्न समृद्धी महामार्ग मात्र ग्रामीण भागातल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
अधिवेशनात भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात आरोप झाले मात्र आरोप झाल्यावरही एकही जण पद सोडायला तयार नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं. अधिवेशनात प्रश्न हे सर्व अनुत्तरीत राहिले. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या एकाही प्रश्नाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे मला याविषयी खंत वाटत असल्याचंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.