नऊ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू तर भावाला वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:05+5:302021-09-13T04:16:05+5:30
भुसावळ, जि. जळग़ाव : दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करीत असताना अनन्या मनीष यादव (९) या मुलीचा पाण्यात ...

नऊ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू तर भावाला वाचविण्यात यश
भुसावळ, जि. जळग़ाव : दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करीत असताना अनन्या मनीष यादव (९) या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तीचा भाऊ आयर्नराज यादव (११) यास वाचवण्यात यश आले आहे. ही घटना झेड. टी. एस. जवळ तापी नदी किनाऱ्यावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाऊ-बहीण बुडाले. या घटनेची माहिती कळताच कंडारी येथील पोलीस पाटील रामा तायडे घटनास्थळी दाखल झाले. तर या परिसरातील रहिवासी व संत गाडगेबाबा हायस्कूलचे शिक्षक पाचपांडे यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन आयर्नराज याला वाचवले. गेल्या वर्षी ही या ठिकाणी गणपती विसर्जनाच्या वेळेस दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता.