गारखेडेजवळ केळीने भरलेला ट्रक उलटून नऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:14 IST2020-04-03T21:12:32+5:302020-04-03T21:14:06+5:30
गारखेडे येथून जामनेरकडे केळीने भरलेला ट्रक उलटून त्यातील नऊ मजूर जखमी झाले.

गारखेडेजवळ केळीने भरलेला ट्रक उलटून नऊ जखमी
ठळक मुद्देट्रक जात होता वाराणशीकडेजखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
जामनेर, जि.जळगाव : गारखेडे येथून जामनेरकडे केळीने भरलेला ट्रक उलटून त्यातील नऊ मजूर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला.
गारखेडे जवळील शेतातून केळी भरुन वाराणशीला जात असलेला ट्रक (क्रमांक एमएच-१९-बीएम-५०५१) उलटला. त्यातील मजूर बापू चव्हाण, एकनाथ चव्हाण, माणिक शेघर, परमेश्वर शिंदे, रमेश चव्हाण, साजन चव्हाण, आकाश शेघर (सर्व रा.ओझर, ता.जामनेर) चालक हरीश फेगडे, प्रदीप सोनवणे रा.फैजपूर, मुकेश गावंडे रा. इच्छापूर, मध्य प्रदेश जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. आर.के.पाटील, डॉ.हर्षल चादां, डॉ.प्रशांत महाजन यांनी उपचार केले.