नेरीनजीक शिवशाही बसची चारचाकी वाहनास धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 13:43 IST2018-09-02T13:43:04+5:302018-09-02T13:43:18+5:30
वाहनाचे मोठे नुकसान

नेरीनजीक शिवशाही बसची चारचाकी वाहनास धडक
नेरी, जि. जळगाव : जळगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने चारचाकी वाहनास धडक दिल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील नेरी येथे झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथून औरंगाबाद येथे जाण्यासाठी शिवशाही बस निघाल्यानंतर नेरीनजीक तिने एका दुचाकीला कट मारली व पुढे चारचाकी वाहनास धडक दिली. यात वाहनाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही.