शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श भारत घडविण्यासाठी संघटित युवापिढीची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : आजच्या युवक-युवतींना दिन विशेषांचे महत्त्व माहिती असेल का, असा प्रश्न सहज पडतो. कुठलीही माहिती हवी असेल, ...

जळगाव : आजच्या युवक-युवतींना दिन विशेषांचे महत्त्व माहिती असेल का, असा प्रश्न सहज पडतो. कुठलीही माहिती हवी असेल, तर हातात मोबाइल घेऊन ही पिढी गुगल सर्च करते, पण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी युवक-युवतींनी प्रजासत्ताक दिनाचा अर्थच नव्हे, तर या दिनाचे महत्त्व विशद केले. त्यातच आदर्श भारत घडविण्यासाठी संघटीत युवापिढीची आवश्यकता असल्याचा सूर युवक-युवतींमधून उमटला.

मंगळवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘लोकमत’ने लोकशाहीतील प्रजासत्ताकाचे महत्त्व, संविधान आदी प्रश्नांबाबत विद्यार्थांची मते जाणून घेतले. त्यावर विद्यार्थी भरभरून बोलले.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस आहे. प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. त्यानुसार, वागायला हवे.

- संजना वानखेडे, विद्यार्थिनी

०००००००००००००००००००००००००

प्रजासत्ताक दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपण सर्व एकत्र येऊ शकत नसलो, तरीही आपण घराघरातून प्रजासत्ताक दिन साजरा करायला हवा.

- रितेश महाजन, विद्यार्थी

०००००००००००००००००००००००००

७२ वर्षांपूर्वी देशाने संविधानाचा स्वीकार करून, लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. आपला देश विविधता आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत आपल्या देशाला विविध प्रकारे दुखापत झाली, पण तरीही आपण कायम आपल्या संस्कृतीचा आदर्श ठेवून वाटचाल करत आलोय. माझ्या या भारत देशाचा मला प्रचंड अभिमान आहे.

- चैतन्य बोरसे, विद्यार्थी

००००००००००००००००००००००००००

प्रजासत्ताक दिनाला ७२ वर्षे जरी पूर्ण झाली असली, तरी आजही भारतामध्ये अनेक संकटे, समस्या निर्माण झाल्या आहेत. एकीकडे भारताने विज्ञान क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली, तर दुसरीकडे समस्यांना सामोरे जातोय. या समस्यांना लढा देण्यासाठी व आदर्श भारत घडविण्यासाठी ध्येयनिष्ठ, कर्तव्यदक्ष, मार्गशील व संघटित युवापिढीची आवश्यकता आहे.

- भूमिका कानडे, विद्यार्थिनी

०००००००००००००००००००००००००

खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल, जेव्हा संविधान कागदावर न राहता, त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल आणि संविधानातील प्रत्येक कर्तव्याची जाण सामान्यांना असेल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

- सौरभ भोई, विद्यार्थी