शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्तेसाठी संघटन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST

जळगाव : येत्या वर्षभरात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेपासून जिल्हा बॅकेपर्यंत विविध स्थानिक निवडणुका येत्या वर्षात आहेत. या संस्थांवर शिवसेनेची सत्ता ...

जळगाव : येत्या वर्षभरात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेपासून जिल्हा बॅकेपर्यंत विविध स्थानिक निवडणुका येत्या वर्षात आहेत. या संस्थांवर शिवसेनेची सत्ता आणायची असेल तर पक्ष संघटन मजबूत करावे लागेल, सत्ता ही संघटनेवर अवलंबून असल्याने जिल्हाभरात शिवसेनेचे ४ लाख सदस्य नोंदविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे आवाहन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले.

शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेची संघटनात्मक जिल्हा बैठक झाली. यावेळी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, गोपाळ चौधरी,रावसाहेब पाटील, पद्मसिंग पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे, नंदलाल पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार नाही, त्या ठिकाणीही विजयाचे उद्दिष्ट ठेवा

गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेत आपली सदस्य संख्या १५ पेक्षा अधिक नाही. ज्या ठिकाणी आमदार आहेत, तेथेच हे सदस्य निवडून येतात. त्यामुळे यापुढच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात आपले आमदार नाहीत, अशी ठिकाणी उद्दीष्ट ठेवून काम करावे लागणार आहे.

विधान परिषद निवडणुकीत विजयामुळे महाविकास आघाडीची ताकत दिसून आली आहे. भाजपला थोपविण्यासाठी स्थानिक निवडणुकीत देखील हे प्रयोग केले जाणार आहेत. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यां‍च्या डीपी दुरूस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. आमदार चिमणराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी किमान ४० जागा आपण जिंकू शकतो असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रास्ताविकात पक्षसंघटनेची स्थिती आणि आगामी निवडणुकीतील संधी याबाबत सांगत सभासद नोंदणीचा कार्यक्रम नियोजन सांगितले

शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफार्मर येण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ट्रान्सफार्म दुरूस्ती आणि ऑईलसाठी जिल्हा नियोजन समितीतून नावीण्यपूर्ण योजनेतून लागणारा ६० लाखाचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. सूत्रसंचलन व प्रास्ताविक विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी केले. तर महानगर प्रमुख शरद तायडे यांनी आभार मानले.