शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

राष्ट्रवादी काँग्रेसची युवा जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:58 PM

चंद्रशेखर जोशी एकेकाळी जिल्ह्यात भक्कम स्थान असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. केवळ पारोळा ...

चंद्रशेखर जोशीएकेकाळी जिल्ह्यात भक्कम स्थान असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. केवळ पारोळा विधानसभा मतदार संघातील डॉ. सतीश पाटील हे विजयी झाले. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्राबल्यही कमी झाले तर काही ठिकाणची सत्ता या पक्षाला गमवावी लागली. त्यानंतर चार वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, कृषि उत्पन्न बाजार समित्या, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्येही हा पक्ष फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. त्यामुळे काहीशी मरगळ गत काळात पक्षात होती. जिल्ह्यातील दिग्गज नेते या पक्षाकडे आहेत. माजी मंत्री, विधासभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन यासह काही माजी आमदार व माजी खासदार या पक्षात आहेत. असे असताना सातत्याने पदरी पडलेले अपयश पक्षाच्या नेत्यांनाही धक्कादायक ठरले आहेत. गत तीन-साडेतीन वर्षात काही मोजकी आंदोलने वगळता पक्षाकडून फारशी आक्रमक आंदोलने सरकार विरोधात झाली नाही, काहीशी मरगळ दिसून आली. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यात काही संघटनात्मक बदल पक्षश्रेष्ठींनी केले. यात जिल्हाध्यक्षपदीची जबाबदारीअ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. महानगरातील अध्यक्षांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेची वाट धरली. या पदावर गेल्या आठवड्यात पक्षातील एक पदाधिकारी नामदेव चौधरी यांच्यावर महानगर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यातच या आठवड्याच्या प्रारंभी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्यातील युवा शक्तीला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात कार्यक्रम राबविले गेले. महाविद्यालयीन युवक-युवतींशी संवाद, महिला मेळावे, कार्यकर्त्यांशी संवाद असे कार्यक्रम सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाले. या काळात जिल्ह्यातील काही प्रलंबित विषयांना त्यांनी हात घालून जनमत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती, हमी भाव, भारनियमन, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरची भाववाढ असे महिलांशी संबंधीत विषय महिलांशी साधलेल्या संवादातून मांडले. थेट महिलांशी प्रश्नोत्तर स्वरूपात त्यांनी संवाद साधला. पक्षाचा कार्यकर्ता आगामी निवडणुकांसाठी तयार व्हावा असे त्यांचे प्रयत्न दिसून आले. येता काळ निवडणुकांचा असल्यामुळे त्यांनी दिलेल्या हाकेला कितपत साथ मिळते हे येता काळच ठरवेल.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस