ncp rupali chakankar meeting in jalgaon | पुढच्या निवडणुकीत दगड दिला तरी निवडून आणा, चाकणकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन
पुढच्या निवडणुकीत दगड दिला तरी निवडून आणा, चाकणकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

जळगाव - ज्यांनी अडचणीच्या काळात पक्षाला साथ दिली नाही, ते जर परत आले तर त्यांच्याआधी पक्षातील कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, कागदोपत्री जी संघटना आहे ती प्रत्यक्षात दिसत नाही. कारणं सांगायची नाहीत, पुढच्या निवडणुकीत दगड दिला तरी निवडून आणा, मनपासाठी आतापासून काम करा, जबाबदारी आपली आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी म्हटलं आहे.

जळगावात आयोजित पक्षाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, पदाधिकारी काम करत नसतील तर पदावरून काढून टाका, प्रत्येक बैठकीत तेच तेच चेहरे पाहायला मिळतात, अनेक वर्षांपासून पदावर राहून महिला पदाधिकारी काम करत नसल्याने चाकणकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 
 

Web Title: ncp rupali chakankar meeting in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.