राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हाच सक्षम पर्याय - अनिल भाईदास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 03:32 PM2019-02-05T15:32:46+5:302019-02-05T15:33:10+5:30

संस्थात्मक अनुभवाच्या बळावर उमेदवारीची अपेक्षा

NCP is the only competent alternative to the Congress - Anil Bhai Dadas | राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हाच सक्षम पर्याय - अनिल भाईदास पाटील

राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हाच सक्षम पर्याय - अनिल भाईदास पाटील

googlenewsNext

जळगाव : शरद पवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान, द्रष्ट्या नेतृत्वाकडून जनसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. भाजपा-शिवसेनेला राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हा सक्षम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास निर्माण करण्यात आम्हाला यश आले असल्याचा दावा जिल्हा बँकेचे संचालक व जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीची तयारी वेगात सुरू असून पक्षीय पातळीवर इच्छुक, सक्षम, प्रबळ अशा उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली आणि निवडणुकीविषयी मनमोकळी चर्चा केली.
प्रश्न: राजकीय वारसा नसतानाही तुम्ही संस्थात्मक जीवनात मोठी कामगिरी केली. याठिकाणी काम करताना तुम्हाला काय अनुभव आला?
पाटील : मला राजकीय पार्श्वभूमी नाही, हे अगदी खरे आहे. माझे वडील नोकरदार होते. माझा जन्म भडगावचा आहे. माझे शिक्षण चाळीसगाव, जळगाव येथे झाले. उच्चशिक्षणासाठी पुण्यात सिंबायसीसमध्ये गेलो. सध्या अमळनेरात वास्तव्य व व्यवसाय करीत आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्थेपासून माझ्या संस्थात्मक जीवनाला सुरुवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचा १० वर्षे सभापती, जिल्हा परिषदेचा १० वर्षे सदस्य, जिल्हा बँकेचा १० वर्षे संचालक आहे. अमळनेर पालिकेत पत्नी जयश्री या नगराध्यक्ष होत्या. यंदाही आमची आघाडी विजयी झाली. पण पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे.
प्रश्न : लोकसभा निवडणूक लढविण्यामागील कारणमीमांसा काय?
पाटील : माझा संस्थात्मक अनुभव पाहता प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित असते. विविध कार्यकारी संस्था, जिल्हा बँक, जिल्हा परिषद गट, पालिका क्षेत्र असा अनुभव घेतल्यानंतर लक्षात आले की, सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघ हा व्यापक आणि लोकाभिमुख कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्याला आव्हानात्मक असा आहे. केंद्र सरकारच्या विविध खात्यांचा मोठा निधी अभ्यासपूर्वक मतदारसंघात आणता येईल, असा मला विश्वास आहे.
प्रश्न : तुम्ही राष्टÑवादी काँग्रेस पक्षात नवखे आहात, तुम्हाला स्विकारले जाईल, असे वाटते.
पाटील : शरद पवार यांचा परिसस्पर्श झालेल्या या पक्षात खुलेपणा, दिलदारपणा असल्याचे अल्पावधीत जाणवले. तळागाळातील माणसांचा तसेच शेतकºयांचा विचार करणारा हा पक्ष आहे. समुद्रातील थेंब बनून त्यात मी सहभागी झालो आहे.
प्रश्न : हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हटला जातो, मग राष्टÑवादी काँग्रेस कशी लढत देणार?
पाटील : २००९ मध्ये आमचे ५ आमदार या मतदारसंघातून निवडून आले होते.
काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे चांगले समन्वय आणि संवाद आहे. पाच वर्षातील भाजपा सरकारच्या कामगिरीने जनता निराश झाली आहे, त्यांना बदल हवा आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत.
प्रश्न : भाजपा सोडण्याचे कारण काय ?
पाटील: २००९ आणि २०१४ मध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने मला उमेदवारी दिली. परंतु, स्थानिक पदाधिकाºयांचे असहकार्य, विरोधकांना केलेली मदत यामुळे पराभव झाला. भाजपामध्ये कार्यकर्त्यांचा फक्त वापर केला जातो, हा अनुभव आला. म्हणून पक्ष सोडला.

Web Title: NCP is the only competent alternative to the Congress - Anil Bhai Dadas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.