धरणगावमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्ला

By Admin | Updated: February 16, 2017 02:49 IST2017-02-16T02:49:34+5:302017-02-16T02:49:34+5:30

तालुक्यातील पाळधी-चांदसर गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली.

NCP candidate attacked in Dharangaon | धरणगावमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्ला

धरणगावमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्ला

ऑनलाइन लोकमत
धरणगाव जि.जळगाव, दि. 16 - तालुक्यातील पाळधी-चांदसर गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली.
पाळधीतील चांदसर रेल्वेगेटनजीक ही घटना घडली.या घटनेत हल्ला झाल्याने दुखापत झाल्याचा दावा करीत रमेश पाटील यांनी धरणगाव पोलीस स्टेशन गाठले.त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या दोन वाहनांवर दगडफेक झाल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले.
 शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप यांच्याविरोधात रमेश पाटील लढत देत आहेत. निवडणूक लढवत आहेत.गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही गटात धुसफूस सुरु आहे. हा हल्ला राज्यमंत्री पाटील समर्थकांनी केल्याचा आरोप रमेश पाटील यांनी केला आहे.यासंदर्भात धरणगाव पोलिसांनी उशारापर्यंत गुन्हा दाखल केलेला नव्हता.

 

Web Title: NCP candidate attacked in Dharangaon