जवानांची नावे ग्रा. पं. मध्ये लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:16 IST2021-07-31T04:16:46+5:302021-07-31T04:16:46+5:30
निंभोरा येथील काही तरुण व तरुणी भारतीय सैन्य दलात आहेत. माजी सैनिक स्व. सुधाकर गंजी सोनवणे हे ...

जवानांची नावे ग्रा. पं. मध्ये लावण्याची मागणी
निंभोरा येथील काही तरुण व तरुणी भारतीय सैन्य दलात आहेत. माजी सैनिक स्व. सुधाकर गंजी सोनवणे हे तर निंभोरा गावासह संपर्ण तालुक्यासाठी वैभव आहे. १९७१ च्या भारत-पाक युध्दात यांचा सक्रिय सहभाग होता व युध्दात ते जखमीही झाले होते. गावातील तरुणांसाठी ते आदर्श असून, अशा व्यक्तीचा गावाला नक्कीच अभिमान आहे. अशा जवानांचा गावाच्या वतीने सन्मान म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यसैनिक व सैन्य दलातील आजी व माजी जवानांची नावे, कार्य व त्यांची रँक लिहावी. हा फलक तरुणांना प्रोत्साहित करू शकतो, अशी मागणी शिवसेना, युवासेना यांच्यासह ग्रा. पं. सदस्य स्वप्निल भीमराव गिरडे यांनी ग्रामसेवक गणेश पाटील यांना निवेदन देऊन केली आहे. निवेदन देताना माजी.पं. स. सदस्य प्रमोद कोंडे, विलास महाले, उमेश पाटील, मोहन महाले, अजय महाले, मोन्टी तायडे आदी उपस्थित होते.