शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

नाम पावन तिन्ही लोकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 10:32 IST

नाम पावन तिन्ही लोकी। मुक्त झाले महापातकी॥ नाम श्रेष्ठांचेही श्रेष्ठ। नाम जपे तो वरिष्ठ॥ नाम जपे नीलकंठ ।वंदिताती श्रेष्ठ ...

नाम पावन तिन्ही लोकी। मुक्त झाले महापातकी॥नाम श्रेष्ठांचेही श्रेष्ठ। नाम जपे तो वरिष्ठ॥नाम जपे नीलकंठ ।वंदिताती श्रेष्ठ श्रेष्ठ॥नाम जपे हनुमंत। तेणे अंगी शक्तीवंतो॥नाम जपे पुंडलिक। उभा वैकुंठ नायक॥नाम ध्यानीमनी देखा। जपे जनार्दनी एका॥नामाचे महत्त्व सांगणारा हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यात एकनाथ महाराजांचा महिमा फार श्रेष्ठ आहे. त्यांनी पांडुरंगाची निष्काम सेवा केली. इतकी सेवा केली की भगवंताला त्यांच्या सेवेचा भार झाला म्हणून भगवंतांनी नाथ महाराजांना सांगितले की काहीतरी मागा पण नाथांनी पांडुरंगाला काहीच मागितले नाही. उलट नाथांनी देवाला भक्तीच मागितली. त्या भक्तीचा भार उतरवण्यासाठी पांडूरंगाने श्रीखंड्याचे रूप घेऊन छत्तीस वर्ष नाथांच्या घरी सेवा केली.नामाला अनन्य महत्व आहे, असे नाथ महाराज या अभंगातून नामाचं महत्त्व सांगतात. नाम हे तिन्ही लोकात म्हणजे स्वर्ग मृत्यु पाताळात श्रेष्ठ आहे. हे नामस्मरण केल्याने जे महापातकी होते ते मुक्त झाले. नाम सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून नामधारक सुद्धा सर्वात श्रेष्ठ आहे. शंकराने रामनामाचा जप केला म्हणून त्यांना विषाची बाधा झाली नाही म्हणून ते महादेव झाले हनुमंताने रामनामाचा जप केला त्यामुळे जगात हनुमंत शक्तिमान झाले. असे अनेक उदाहरणे आहेत. कलियुगामध्ये नामजपाला फार महत्त्व आहे. मंत्र जपाने अध्यात्मिक शक्ती व ऊर्जा निर्माण होईल व अध्यात्मिक शक्तीनेच असाध्य कार्य साध्य होते. नाम या शब्दातील ना व म या दोन अक्षरांची उलटापालट केली तर मना शब्द तयार होतो मनाला उत्तम घडविण्याचे कार्य नामस्मरण करते. नवविधा भक्तीमध्ये श्रवण, कीर्तन,नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे विविध प्रकार आहे मात्र यातील नामस्मरण भक्ती हा प्रकार सोडला तर सर्व प्रकार परस्वाधीन आहे त्यासाठी कसलीतरी सज्जता असली पाहिजे. तयारी असावी लागते. वस्तू काळवेळ यावर सर्व अवलंबून आहे मात्र नामस्मरणाला कसलेही बंधन नाही. त्यामुळे हा बंध मुक्त असा भक्ती प्रकार आहे. नामाचा महिमा व त्यांची दैवी अनुभव अनेक संतांनी आपल्या अभंग काव्य ग्रंथात सांगितले आहे. साधे सोपे व सरळ म्हणजे नामस्मरण होय. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केवळ नामस्मरण हा भक्तीचा प्रसार करूनच हा मार्ग किती सोपा आहे, हे दाखवून श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करण्याची शिकवण दिली. राम नामाचा महिमा अगाध आहे. राम म्हणता रामची होईजे पदी बैसुनी पदवी घेईजे असा उल्लेख अभंगात आहे. नामस्मरणाची व्याप्ती वाढली की त्या व्यक्तीचे प्रभुत्व तेच लखलखते कलियुगामध्ये नामस्मरणाची आज नितांत गरज आहे. नामस्मरणाची सवय संस्कार लहानपणापासून अंगीकारणे गरजेचे आहे नामस्मरणाचे धडे लहान वयात दिल्याने शरीराला त्याची सवय होत असते.आरंभी आवडी आदरे आले नाम। तेणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम॥ असा नामाचा अगाध महिमा आहे. त्यासाठी सर्वांनी नामजप करावा कोरोना महामारी चा संकट तत्काळ निवारण व्हावे अशी प्रार्थना प्रत्येकाने करावी.- सुपाशेठ सदाफळे, नशिराबाद

टॅग्स :Jalgaonजळगाव