शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

खान्देशातील ६७ पैकी एकाच महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:26 PM

कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची उदासीनता

ठळक मुद्देधक्कादायक३१ डिसेंबरची ‘डेडलाईन’

सागर दुबेजळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ८३ अनुदानित महाविद्यालयांपैकी ८२ तर कायम विनाअनुदानित ६७ पैकी फक्त एकाच महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन करून घेतल्याची माहिती समोर आली आहे़ ३१ डिसेंबरपर्यंत ते करून घेण्याचे आदेश उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे यांनी संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत.दर पाच वर्षांनी नॅक कमिटी महाविद्यालयांचे मूल्यांकन करीत असते. यात महाविद्यालयांची रंगरंगोटी, भौतिक सुविधा आदी कामे महत्त्वाची ठरतात़ जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील काही महाविद्यालये नॅक मूल्यांकनाला सामोरे न जाता शासनाचे अनुदान लाटत आहेत़ सद्यस्थितीला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ८३ अनुदानित तर ६७ कायम विनाअनुदानित महाविद्यालये आहेत़ अनुदानित महाविद्यालयांपैकी ८२ महाविद्यालयांनी मूल्यांकन करून घेतलेले आहे़ तर दोंडाईचा येथील पी़बी़बागल महाविद्यालय अद्याप नॅक मूल्यांकनाला सामोरे गेलेले नाही, अशी माहिती उच्च शिक्षण सहसंचालकांनी दिली.खान्देशातील ११ महाविद्यालयांना अ श्रेणीनॅक मूल्यांकनानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अनुदानित ८२ महाविद्यालयांपैकी ११ महाविद्यालयांना अ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे़ ५९ महाविद्यालयांना ब श्रेणी तर १२ महाविद्यालयांना क श्रेणी मिळालेली आहे़ तसेच कायम विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी फक्त शहादा येथील शहादा कॉ़ आॅप-सोसायटी महाविद्यालय हे नॅक मूल्यांकनाला सामोरे गेलेले आहे़ज्या महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन नाही, ती महाविद्यालये रूसा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानास अपात्र ठरणार आहे तसेच त्या महाविद्यालयांवर कारवाई सुद्धा केली जाईल, म्हणून ३१ डिसेंबरच्या आत मूल्यांकन करून घ्यावे.-केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव