वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 02:48 PM2021-06-08T14:48:16+5:302021-06-08T14:58:09+5:30

सहा महिन्यांपूर्वी याच भागातील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीच्या लहान नातीच्या वाढदिवसाच्या दिवशी धक्का लागल्याच्या कारणावरूण मयत व आरोपींमध्ये वाद झाला होता.

Murder of a youth with a sharp weapon in Varangaon | वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून

वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देचार संशयिताना अटक जुन्या भांडणाचे कारण

वरणगाव, ता.भुसावळ : जुन्या भांडणातून तरुणावर धारदार शस्त्राने आठ ते दहा वार करून खून केल्याची घटना ८ रोजी रात्री साडेदहाला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील महालक्ष्मी सॉ मिलसमोर घडली. या प्रकरणी चौघा  संशयिताना  पोलिसांनी अटक केली आहे. सचिन मगरे (वय २७, रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव) असे मयताचे नाव आहे.
 याबाबत पोलिसांत मयताचा भाऊ भीमराव जीवराम मगरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील डॉ.बाबासाहेब आबेडकर पुतळ्याजवळील महालक्ष्मी सॉ मिलसमोर आरडाओरड करण्याचा आवाज येत होता. ते बघण्यासाठी गेलाे असता  तेथे भाऊ सचिन मगरे यास चौघ संशयित रोहित किशोर तायडे, अजय रवींद्र तायडे, राहुल गजानन कदम व अक्षय संजय भैसे हे मारहाण करताना दिसून आले. त्यापैकी अजय तायडे याने धारदार शस्त्राने सचिनच्या पाठीवर व मानेवर वार केले. तसेच रोहित तायडे यानेसुद्धा छातीत व तोंडावर वार केल्यामुळे सचिन हा रक्ताच्या थारोळ्यात पडला व मारेकरी आपल्यासमोर ते पळून गेले.
मित्रांच्या मदतीने सचिन यास ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, मागील सहा महिन्यांपूर्वी याच भागातील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीच्या लहान नातीच्या वाढदिवसाच्या दिवशी धक्का लागल्याच्या कारणावरूण मयत व आरोपींमध्ये वाद झाला होता व मिटलासुद्धा होता. मात्र सोमवारी रात्री तो वाद पुन्हा उफाळून आल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. 
दरम्यान, राहुल कदम यानेसुध्दा आपल्याला मारहाण केल्याचे भीमराव मगरे याने तक्रारीत म्हटले आहे. तपास स.पो.नि. संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरू आहे.
 

Web Title: Murder of a youth with a sharp weapon in Varangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.