Jalgaon: जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तरूणाचा खून !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 00:00 IST2023-03-27T00:00:37+5:302023-03-27T00:00:57+5:30
Crime News: गेल्या तीन ते चार दिवसांपासून जळगाव जिल्हयात खुनाचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री १० वाजता जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये ३० ते ३५ वर्षीय तरूणाची धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.

Jalgaon: जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तरूणाचा खून !
- सागर दुबे
जळगाव : गेल्या तीन ते चार दिवसांपासून जळगाव जिल्हयात खुनाचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री १० वाजता जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये ३० ते ३५ वर्षीय तरूणाची धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रात्री उशिरापर्यंत तरूणाची ओळख पटलेली नव्हती. मात्र, खून होण्यापूर्वी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर काही तरूणांमध्ये वाद झाला होता, त्यातून हा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गोलाणी मार्केटमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसन नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहचले आहेत. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला. मात्र, मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, पोलिसांकडून तरूणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर नेमकी काय घटना घडली याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.