भुसावळमध्ये जुन्या वादातून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 00:49 IST2018-05-07T00:49:26+5:302018-05-07T00:49:26+5:30

जुन्या वादातून येथील पंचशील नगरात आनंद अशोक वाघमारे (३५) याची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री नऊला घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला.

Murder in Bhusawal | भुसावळमध्ये जुन्या वादातून खून

भुसावळमध्ये जुन्या वादातून खून

जळगाव - जुन्या वादातून येथील पंचशील नगरात आनंद अशोक वाघमारे (३५) याची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री नऊला घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला.
सूत्रांनुसार, पंचशील नगरातील रहिवासी आनंद वाघमारे व प्रल्हाद होलाराम सचदेव यांच्यात जुने वाद होते. मात्र ते रविवारी रात्री मद्य सेवन करण्यासाठी एकत्र बसले. यादरम्यान या दोघांची बोलाचाली होऊन प्रल्हाद याने आनंदा याच्यावर चाकूने वार केले. त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, घटनेनंतर आरोपी फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा खून झाल्याने नागरिक धास्तावले आहेत.

Web Title: Murder in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.