शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

पाडळसरे जनआंदोलनाचे स्वरूप वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:55 PM

पाडळसरे धरण युद्धपातळीवर सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनीही रविवारी पाठिंबा दिला. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघानेही जनतेच्या प्रश्नावर आंदोलनात उडी घेतल्याने धरण आंदोलनाने जनांदोलनाचे स्वरूप धारण केले आहे.

ठळक मुद्देसहाव्या दिवशीही उपोषण सुरूचआजी-माजी आमदारांनी दिली भेटपाडळसरे धरणासाठी भाकपाचाही पुढाकार

अमळनेर, जि.जळगाव : पाडळसरे धरण युद्धपातळीवर सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनीही रविवारी पाठिंबा दिला. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघानेही जनतेच्या प्रश्नावर आंदोलनात उडी घेतल्याने धरण आंदोलनाने जनांदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. आंदोलनास सहा दिवस झाले तरी निम्नतापी प्रकल्प पाडळसरेच्या एकाही अधिकाऱ्याने आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांनी निषेध नोंदविला.आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी आंदोलनास संबोधित करताना सांगितले की, मीही धरण समितीचा आंदोलक असून, आंदोलनासोबत आहे. डॉ.बी.एस. पाटील यांच्या कार्यकाळात धरणाला १२१.५६ कोटी रुपये प्राप्त झाले होते. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळात १३९ कोटी ९७ लाख रुपये मिळाले तर माझ्या कार्यकाळात आतापर्यंत २०० कोटी ८२ लाख रुपये प्राप्त झाले आहे. मात्र राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा मर्यादित व तोकडा आहे. म्हणून केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करून प्रयत्नपूर्वक जलआयोगाची मान्यता मिळविली.डॉ.बी.एस.पाटील यांनी सर्वपक्षीय लोकांनी त्यागाची भूमिका घेऊन पाडळसे धरण या एकाच विषयासाठी झटावे, असे आवाहन केले.समितीचे माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील यांनी आंदोलनाची भूमिका लोकप्रतिनिधींसमोर मांडली.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याने आंदोलनाचे बळ वाढले असल्याची भावना समितीच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली.जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांनीही सचिन पाटील व सहकाºयांसह यावेळी अमळनेर तालुका सरपंच सेवा संघ अध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव प्रा.सुनील पाटिल, कार्याध्यक्ष प्रा.पी.के.पाटील,डी.एम.पाटील यांच्यासह अमळनेर तालुका सिड्स पेस्टीसाईड्स फर्टिलायझर असोसिएशन योगेश पवार, प्रशांत भदाणे, मुन्ना पारख, ललित ब्रह्मेचा, मुस्तफा बोहरी, भानुदास पाटील, दीपक पाटील, तेजस जैन, रवींद्र पाटील, किरण पाटील, राकेश महाजन आदींनीही पाठिंंबा देवून उपोषणात सहभाग नोंदवला. जीवन फाउंडेशनचे ईश्वर मोरे, सुंदरपट्टी, हेडावे, शहापूर, जनसेवा फाउंडेशनचे पीयूष ओस्तवाल, विजय कटारिया, विपुल मुनोत, दिनेश कोठारी, अमोल ललवाणी, रोनक पारख, जितू संकलेचा, प्रतीक लोढा, काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ पाटील, धनगर पाटील, नगरसेवक मनोज पाटिल, मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, पुंडलिक तुळशीराम बडगुजर, खडके सरपंच, खाउशीचे अरुण देशमुख, डॉ.प्रशांत देवरे, डॉ.रवींद्र जैन, सुधाकर पवार, अरुण पुंडलिक पाटील, जाकीर शेख, प्रदीप गोसावी, महेंद्र जैन, संजय काटे, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र नवसारीकर, एस.एम.पाटिल आदींसह ग्रामिण भागातून शेतकरी मोठ्या संख्येने आज सहभागी झाले होते.भाकपानेही घेतला पुढाकारचोपडा : पाडळसरे धरणप्रश्नी अमळनेर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी भाकपानेही पुढाकार घेतला आहे. या आंदोलनास पाठिंबा देणारे पत्रक भाकपाचे राज्य समिती सदस्य अमृत महाजन, शांताराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकांत साळी, लक्ष्मण शिंदे, मनोहर चौधरी, योगराज पाटील, भगवान पाटील, धोंडू पाटील, निर्मला शिंदे, गोरख वानखेडे, भागवत सूतार, उषाबाई लोहार, शिवाजी पाटील, वासुदेव कोळी आदींनी काढले आहे. या आंदोलनात भाकपाबरोबरच किसानसभा शेतमजूर, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ, आयटक संघटनांनीही उतरण्याचा निर्धार केला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनAmalnerअमळनेर