मोटर सायकल चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 10:28 PM2021-01-19T22:28:47+5:302021-01-19T22:37:09+5:30

दुचाकी चोरून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Motorcycle theft racket smashed. | मोटर सायकल चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त.

मोटर सायकल चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त.

Next
ठळक मुद्देवीस मोटरसायकलीसह सहा आरोपींना अटक, कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विक्री
कमत न्यूज नेटवर्क धरणगाव : येथून जवळच असलेल्या बोरगावात पोलिसांना सुगावा लागताच मोटरसायकल चोरांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून २० मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. येथून जवळच असलेल्या बोरगावात जयेश पाटील नावाचा व्यक्तीजवळ एकच क्रमांकाच्या दोन मोटरसायकल असल्याची गुप्तवार्ता धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ पोलिस हेड काॅन्स्टेबल खुशाल पाटील, मोती पवार, दीपक पाटील, गजेंद्र पाटील, वसंत कोळी यांनी या ठिकाणी जाऊन खात्री केलेली संशयित मोटारसायकल त्या ठिकाणी मिळून आल्याने त्याबाबत या इसमास विश्वासात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. त्याने भूषण विजय पाटील (पळासखेडा सिम ता. पारोळा) याच्याकडून या मोटरसायकल घेतल्याचे कळले. त्याने अनेक लोकांना जुन्या मोटरसायकली विक्री केल्याचे समजले. मोटरसायकल देताना तो कागदपत्र नंतर देतो, असे सांगत असे. या माहितीवरून भूषणला चौकशीकरिता ताब्यात घेऊन सखोल माहिती हाती आली. त्याने मागील एक ते दीड वर्षात वेळोवेळी १० हजार रुपये प्रत्येकी देऊन ९ मोटरसायकली भूषण धनराज पाटील, अमोल नाना पाटील (दोन्ही रा. शनी मंदिर चौक, पारोळा) यांच्याकडून विकत घेऊन समोरच्यांना विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार भूषण व अमोल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी चिंचपूरा. (धरणगाव), चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपूर अशा अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करून त्या भूषण विजय पाटील, जयेश रवींद्र चव्हाण. (जवखेडा ता. अमळनेर), ज्ञानेश्वर राजेंद्र धनगर (वर्डी ता. चोपडा), पंकज मधुकर खजुरे (राजीव गांधीनगर, पारोळा) यांच्यामार्फत सामान्य लोकांना विक्री केल्याचे समजले. यावरून सहाही आरोपींना धरणगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आले. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, हेड काॅन्स्टेबल खुशाल पाटील, मोती पवार, दीपक पाटील, गजेंद्र पाटील, वसंत कोळी अशा धरणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने गुन्हे प्रकटीकरणसाठीचे काम कौशल्याने केले. या कारवाईत सहा आरोपींना अटक करून एकूण २० मोटरसायकल हस्तगत केली आहेत. मोटरसायकल चोरी करणारे व विक्री करणारे यांनी संगनमताने सामान्य लोकांना विशेषतः खेड्यातील लोकांना गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगून चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्याची पद्धत अवलंबल्याचे समोर आले आहे. कोणीही नागरिकांनी विना कागदपत्र वाहन विकत घेऊ नये अशी वाहने चोरीची असल्याचे समजल्यानंतर पोलिस कारवाईला सामोरे जावे लागते, असे आवाहन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले.

Web Title: Motorcycle theft racket smashed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.