Mobile cigarettes found only because of cigarettes | केवळ सिगारेटमुळे सापडला मोबाईल चोरटा
केवळ सिगारेटमुळे सापडला मोबाईल चोरटा


जळगाव : पोलिसांनी ठरवलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही...कधी पोलिसांचे लक अन् गुन्हेगाराचे बॅडलक हे देखील कारणीभूत असते. तांत्रिक पुरावे घटनास्थळावरील काही पुरावे गुन्हे उघडकीस आले आहेत. खबऱ्या ही संकल्पना लोप पावत असताना.. आता सिगारेट व खबºया यांच्यामुळे रिक्षातून प्राध्यापकाचा मोबाईल लांबविणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा.विजय एल. माहेश्वरी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बºहाणपूर येथून जळगाव स्थानकावर उतरले. गुजराल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ते वास्तव्याला असल्याने शिवाजीनगरच्या दिशेने रिक्षा थांब्यावर गेले. तेथून एका रिक्षातून ते घरी गेले. यादरम्यान रिक्षा चालकाने सिगारेट ओढली व एका ठिकाणाहून शेंगदाणे घेतले. पुढे काही अंतरावर मागे बसलेले दोघे प्रवाशी उतरले. पुढचा रिक्षा चालकाचा मित्र मागे प्रा. माहेश्वरी यांच्याजवळ बसला. गुजराल पेट्रोल पंपाजवळ उतरल्यावर माहेश्वर यांना मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आले.

चोरी गेलेला मोबाईलबाबत प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठातील कायदा अधिकारी प्रा. एस. आर. भादलीकर व संगणक प्रशास्त्र विभागाचे प्रा. राम भावसार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांची भेट घेऊन माहिती दिली. रोहोम यांनी विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर व चंद्रकांत पाटील यांना याबाबत सूचना केल्या. यात प्रा. माहेश्वरी यांनी चालकाला सिगारेट व्यसन असल्याचे सांगितले. त्यामुळे दिनेश बडगुजर यांनी गुजराल पेट्रोल पंपाजवळील खबºयाचा वापर करुन सिगारेटचे व्यसन असलेल्या रिक्षा चालकाची माहिती काढली असता एकजण निष्पन्न झाला. त्यानंतर प्रा. माहेश्वरी यांना लपून खात्री करायला सांगितली. तो निष्पन्न झाल्यावर त्याचवेळी प्रा.माहेश्वरी यांच्या मुलीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता एकदा रिंग वाजली नंतर फोन बंद झाला. त्यामुळे यंत्रणेने तांत्रिक आधार घेऊन मोबाईल असलेली व्यक्ती कुठे आहे याचा शोध घेतला असता रिक्षाचालक व त्याचा मित्र असे दोघं निष्पन्न झाले. पोलीसी खाक्याचा दम भरताच त्यांनी मोबाईल काढून दिला.

Web Title: Mobile cigarettes found only because of cigarettes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.